रंग-रेषांचा सुरेख रंगोत्सव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

औरंगाबाद - कलेच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी विद्यार्थीप्रिय ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा-२०१८ शहरातील ४४ परीक्षा केंद्रांवर सोमवारी (ता. १७) एकाच वेळी घेण्यात आली. यामध्ये विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

मुलं ही देशाचं भविष्य असल्याने त्यांच्या कलेला वाव मिळावा, या दृष्टिकोनातून ‘सकाळ’च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात. ‘सकाळ बालचित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. औरंगाबादेत सोमवारी ४४ केंद्रांत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. स्पर्धेत सहभागी हजारो विद्यार्थ्यांनी सप्तरंग आणि कुंचल्यातून भावविश्व रेखाटले. बोचऱ्या थंडीत सकाळी ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेला शहरातील विविध शाळांमध्ये सुरवात झाली.

Web Title: Sakal Drawing Competition