सकाळ समूहाने चित्रकला जिवंत ठेवली

नवनाथ इधाटे
रविवार, 16 डिसेंबर 2018

फुलंब्री येथील संत सावता माळी महाविद्यालयाच्या मैदानात सकाळमाध्यम समूहाच्या वतीने रविवारी (ता.16) सकाळ चित्रकला स्पर्धा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.स्पर्धेत फुलंब्री तालुक्यातून पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

फुलंब्री : सध्याच्या अत्याधुनिक युगात चित्रकला हा विषय काळाच्या ओघात लुप्त होत चालला असून केवळ सकाळ माध्यम समूहाने चित्रकला अस्तित्वात ठेवली असल्याचे मत फुलंब्री नगरपंचायतीचे (जि.औरंगाबाद) नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी व्यक्त केले.

फुलंब्री येथील संत सावता माळी महाविद्यालयाच्या मैदानात सकाळमाध्यम समूहाच्या वतीने रविवारी (ता.16) सकाळ चित्रकला स्पर्धा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. स्पर्धेत फुलंब्री तालुक्यातून पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. चित्रकला स्पर्धा सुरु असतांना फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, योगेश मिसाळ, राम बनसोड, आवेज चिस्ती, वाल्मिक जाधव,  व त्यांच्या सहकाऱ्यांनी चित्रकला स्पर्धेला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच सकाळी आठ वाजल्यापासूनच लहान मुलांनी मोठी गर्दी केली होती.

शिरसाठ म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी सकाळ समूहाने चित्रकला स्पर्धेचा एक आगळा वेगळा उपक्रम राबवून मुलांना आत्मविश्वास वाढविण्याचे काम करीत आहे. फुलंब्री शहरातील 149 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. ही चित्रकला स्पर्धा पार पाडण्यासाठी संत सावता गुरुकुल, जिल्हा परिषद शाळा फुलंब्री येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. यावेळी येथील शिक्षक अनिल सोनवणे, रवि दामोधर, कृष्णा आढाव, काकासाहेब काकडे, पुंजाराम शेजुळ, सोमनाथ पेहरकर, जयराम जाधव, सुभाष म्हस्के, जितेंद्र गवई, योगेश जगधने आदी  शिक्षक, विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: sakal drawing competition in phulambri