'सकाळ'च्या बातमीनंतर शितलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार पूर्ण

sakal news effect the dream of becoming a Shital doctor will be fulfilled
sakal news effect the dream of becoming a Shital doctor will be fulfilled

बीड : मेहनतीने अभ्यास करुन वैद्यक शाखेला प्रवेश मिळावा एवढे गुण मिळवूनही शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने शितल जाधवचे भवितव्य अंधारात ढकलले गेले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही खास बाब म्हणून तिला प्रवेशास मान्यता मिळाली आणि बुधवारी (ता. 5) येथील आदित्य दंत महाविद्यालयात तिचा प्रवेश निश्चित झाला. तिची आई गेली असली तरी तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ‘सकाळ’ने ता. 28 ऑगस्टच्या अंकात ‘स्वप्न भंगले आणि आईही गेली’ या मथळ्याखाली शितलची व्यथा मांडली होती.

साळींबा (ता. वडवणी) येथील अल्पभूधारक शेतकरी कुटूंबातील सरस्वती व अशोक जाधव या दाम्पत्याला शितलसह मच्छिंद्र आणि अतुल अशी तीन आपत्ये आहेत. या दाम्पत्याने शेती व मजूरी करुन मुलांचे शिक्षण केले. अतुल जाधव फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. तर, मच्छिंद्र हा खासगी दवाखान्यात काम करुन आपल्या परिचर्या (बीएससी नर्सिंग) पदवीचे शिक्षण करतो. डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेली शितल लातूरला शिक्षणासाठी गेली. मागच्या वर्षी तिला इच्छीत शाखेला प्रवेश मिळाला नाही म्हणून तिने रिपीट केले.

वैद्यकीय पूर्व परिक्षेतील गुणांनुसार तिचा दंत वैद्यक प्रवेश यादीत येथील आदित्य दंत महाविद्यालयाच्या यादीत तिचा क्रमांक होता. इबीसी सवलतीचे निम्मे शुल्क वगळून उर्वरित एक लाख 62 हजार रुपये भरुन ता. 18 ऑगस्ट पर्यंत प्रवेश घ्यायचा होता. परंतु, ही रक्कम नसल्याने तिला प्रवेश घेता आला नाही. याच तणावातून तिची आई सरस्वती यांनी आत्महत्या केली. यामुळे आईही गेली आणि भविष्यही अंधारात ढकलले अशी तिची अवस्था झाली होती. परंतु, मुदत संपल्याने खास बाब म्हणून तिला प्रवेशास मान्यता भेटली आणि बुधवारी येथील आदित्य दंत महाविद्यालयात तिला प्रवेश भेटला.

आमदार देशमुखांचा पाठपुरावा आणि मदत
दरम्यान, ता. 18 ऑगस्टला तिचा प्रवेश झाला नाही तिने रिटेशन ऑप्शन न भरल्याने तीचे नाव ‘नॉट इलिजीबल’ यादीत आले. परंतु, आमदार आर. टी. देशमुख यांनी तिला खास बाब म्हणून प्रवेश मिळावा यासाठी पाठपुरावा केला. सीईटी सेलचे राज्य आयुक्त आनंद रायते यांनी शितल जाधवला खास बाब म्हणून प्रवेश द्या अशा सुचना येथील आदित्य महाविद्यालयास दिल्या. त्यानुसार बुधवारी प्रवेश प्रक्रीया पूर्ण झाली. तिच्या शुल्काची एक लाख 62 हजार 500 रुपयांची रक्कमही आमदार श्री. देशमुख यांनी अदा केली.

‘सकाळ’ने मांडली होती व्यथा
शितल जाधव हीचे भंगलेले स्वप्न आणि तिच्या आईने आत्महत्या करण्याचे कारण तसेच तिची परिस्थिती या सर्व बाबींवर ता. 28 ला ‘सकाळ’मधून ‘स्वप्न भंगले आणि आईही गेली’ ‘मेडिकल प्रवेश हुकलेल्या शीतलचे भविष्य अधांतरी’ या मथळ्याखाली व्यथा मांडली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com