मराठवाड्यातील उद्योजकांशीही संवाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

औरंगाबाद - महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी पुणे व कोकण विभागातील उद्योजकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राज्यातील अन्य भागांतील उद्योजकांशी दुसऱ्या टप्प्यात संवाद साधण्यात येणार असल्याची भूमिका महावितरणने स्पष्ट केली आहे. 

औरंगाबाद - महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी पुणे व कोकण विभागातील उद्योजकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राज्यातील अन्य भागांतील उद्योजकांशी दुसऱ्या टप्प्यात संवाद साधण्यात येणार असल्याची भूमिका महावितरणने स्पष्ट केली आहे. 

संजीवकुमार यांनी पुणे व कोकण विभागातील उद्योजकांशी संवाद साधताना औरंगाबाद प्रादेशिक विभागातील जळगावचा समावेश केला. जळगाव हे औरंगाबाद प्रादेशिक विभागात येते. त्यामुळे मराठवाडा व औरंगाबाद वगळून जळगावचा समावेश केल्याने औरंगाबादच्या उद्योजकांना व्हिडिओ कॉन्फरन्समधून वगळल्याची भावना निर्माण झाली होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच, महावितरणने आपली भूमिका जाहीर केली. एकाच टप्प्यात राज्यातील सर्व उद्योजकांशी संवाद साधणे शक्‍य नसल्याने दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद प्रादेशिक विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील तसेच नागपूर प्रादेशिक विभागातील उद्योजकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्यात येणार आहेत, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. महावितरणच्या या भूमिकेने आता मराठवाड्यातील उद्योजकांना महावितरणच्या अध्यक्षांशी संपर्क साधून प्रश्‍न मांडण्याची प्रतीक्षा आहे. 

उद्योजकांना प्रतीक्षा
उद्योजकांना नेहमीच महावितरणच्या विविध प्रश्‍नांशी तोंड द्यावे लागते. अनेकवेळा महावितरणच्या धोरणात्मक निर्णयाचा फटका बसतो, तर काही वेळा स्थानिक पातळीवरील विविध प्रश्‍नांशी उद्योजकांना झगडावे लागते. त्यामुळेच महावितरणच्या अध्यक्षांशी संवाद साधण्याची येथील उद्योजकांना उत्कंठा आहे.

Web Title: sakal news impact Communication with Marathwada entrepreneurs