पाऊस.jpg
पाऊस.jpg

Sakal News Impact : पावसाचे मोजमाप पुन्हा सार्वजनिक 

जालना : राज्य शासनाकडून रोज पडणाऱ्या पावसाच्या मोजमापाची आकडेवारी सार्वजनिक न करण्याचा फतवा काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला मिळाला होता. त्यानुसार रोज पडणाऱ्या पावसाच्या मोजमापाची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सार्वजनिक करणे बंद केले होते.

यासंदर्भात (ता.३१) जुलै रोजी 'सकाळ'ने वृत्त प्रकाशीत केले. या वृत्ताची दखल घेत शासनाच्या महावेध संकेतस्थळावरील पावसाच्या मोजमापाची अकडेवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून मागील दोन दिवसांपासून सार्वजनिक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना त्यांच्या भागात किती पाऊस झाला याची माहिती मिळणे पुन्हा सुलभ झाले आहे. 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाला चोवीस तासांच्या काळात झालेल्या पावसाची आकडेवारी सार्वजनिक न करण्याचा राज्य शासनाचा फतवा काही दिवसांपूर्वी प्राप्त झाला. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देखील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापानाला याबाबत एक आदेश पत्र पाठविण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यात रोज पडणाऱ्या पावसाची माहिती राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला महावेध या संकेतस्थळावर पाहता येत होती. 

त्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला महावेध या संकेतस्थळावरील पावसाचे मोजपाम पाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड दिला. मात्र, राज्य शासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाकडून पावसाची अकडेवारी जाहीर केली जात नव्हती. परिणामी कोणत्या जिल्ह्यात किती अन् कुठे अतिवृष्टी झाली ? त्यामुळे पिकांने नुकसान झाले का ? याची माहिती सामान्य नागरिकांना उपलब्ध होणे बंद झाले होते. 

या संदर्भात 'सकाळ'ने (ता. ३१) जुलै रोजी वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर प्रशासन आणि शासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून पुन्हा पावसाची अकडेवारी सार्वजिनक करण्यास सुरवात केली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून महावेध या शासनाच्या संकेतस्थळावरील पावसाच्या मोजपामाची माहिती सार्वजनिक करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या मंडळात किती पाऊस झाला ? कोणत्या मंडळात अतिवृष्टी झाली ? याची माहिती पुन्हा सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

संपादन-प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com