'सलमानच्या यशामुळे स्पर्धा परीक्षेची पाऊल वाट पडली'

नवनाथ इधाटे
गुरुवार, 3 मे 2018

फुलंब्रीत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेख सलमानचा नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नगरपंचायतिच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

फुलंब्री : नुकत्याच यूपीएससी परिक्षेत उत्तीर्ण होऊन यशाच्या शिखरावर पोहचलेल्या शेख सलमान शेख उमर यांच्या रूपाने फुलंब्रीत स्पर्धा परीक्षेची पाऊल वाट पडली असून त्या दिशेने अनेक विद्यार्थी जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात अधिकाऱ्यांची फुलंब्री म्हणून आपला तालुका नावारूपास येणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.

फुलंब्रीत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेख सलमानचा नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नगरपंचायतिच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, इफकोचे केंद्रीय संचालक अड.त्र्यंबकराव शिरसाठ, उपमहापौर विजय औताडे, सभापती सर्जेराव मेटे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई चव्हाण, मुख्याधिकारी योगेश पाटील, सलमानचे वडील शेख उमर, योगेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे सलमानने दाखवून दिलेले आहे.

अतिशय बिकट परिस्थितीतून युपीएससी परीक्षेत सलमानने घवघवीत यश संपादन केले आहे. फुलंब्रीत अधिकारी होणाऱ्याची संख्या आगामी काळात वाढणार असून सलमानच्या रूपाने ही पाऊल वाट पडली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून या पाऊल वाटेने अनेक विद्यार्थी जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देऊन स्पर्धा परीक्षेत उतरायला पाहिजे. त्यावेळेस या पाऊल वाटाचे रूपांतर हायवे मध्ये होऊ शकते. अधिकाऱ्यांची फुलंब्री म्हणून भारतात फुलंब्रीचे नाव लौकिक होऊ शकते. यंदा यूपीएसीसी परीक्षेत मुस्लिम समाजाचे सुमारे 48 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. तसेच शासनाने सुद्धा अभ्यासू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महत्वकांक्षी योजना सुरू केलेल्या आहे. त्याचा लाभही अनेक विद्यार्थीनी घेतलेला आहे. बारावीचे वर्ष मुलांना दिशा देण्याचे काम करीत असते. त्यामुळे आपल्या पाल्यांना कोणती दिशा द्यायची याचा विचार पालकांनी करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळाले तरी गावची नाळ तुटायला नाही पाहिजे. असे मत दानवे यांनी यावेळी व्यक्त केले. 

Web Title: Salman Shaikh passed UPSC exam