कोरोना रोखण्यासाठी निलंगेकरांनी दिले स्थानिक विकास निधीतून एक कोटी

Sambhaji Patil Nilangekar News
Sambhaji Patil Nilangekar News

निलंगा (जि.लातूर) : देशभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्ग दिवसेंदिवस पसरत असून आरोग्य विभागाच्या उपाय योजनासाठी सर्व साहित्य उपलब्ध व्हावे व कोरोनाग्रस्त नागरिकांना चांगली सुविधा मिळावी, यासाठी माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे लेखीपत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे निलंगा मतदारसंघातील आरोग्यसुविधा साहित्य उपलब्ध होण्यासाठी या निधीमुळे मोठी मदत होणार आहे.


कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या देशभर टाळेबंदी केले आहे. ती एकवीस दिवस राहणार आहे. सध्या शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुणे व मुंबई विशेषतः या भागातून रोजगारासाठी गेलेले तरुण आपल्या मूळगावी परतत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आता बाहेरगावाहून आलेल्या लोकांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या गाव पातळीवर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य यासह विविध लोकप्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करून प्रयत्न करीत आहेत. शिवाय ग्रामीण भागात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी रुग्णासाठी अत्यावश्यक सुविधा नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून निलंगा मतदारसंघाचे आमदार निलंगेकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे.

याबाबत त्यांनी लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे व्हेंटिलेटर सुविधा व कोरोनासाठी अत्यावश्यक साहित्य सुविधा या निधीतून घेण्यात यावे असे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे. या एक कोटीचा निधीमुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य आरोग्य केंद्रासाठी हा निधी महत्त्वाचा मानला जात आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील आरोग्याची सुविधेत सुधारणा होण्यात मदत होईल.  

त्यांनी उभा केला नवीन संसार, आगीत खाक झाले होते घर
हेर (जि.लातूर) ः हेर (ता.उदगीर) येथील संतोष सोपान सुर्यवंशी यांचे घर जळुन खाक झाले आहे. त्यांना शासनाकडून अद्याप मदत मिळाली नाही. परंतु हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रवि वाघमारे, डॉ.संजय सांडोळकर  व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेविका दैवशाला मुंडे व माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजकुमार तवंडे यांनी मिळून या गरीब कुटुंबाचा नवीन संसार उभा करून दिला आहे. यामध्ये वाघमारे यांनी संसारात लागणारी सर्व भांडी व नगदी दोन हजार रुपये व डॉ.सांडोळकर यांनी घरात लागणारा किराणा माल, तर सेविका मुंडे व तवंडे यांनी एक क्विंटल ज्वारी अशी मदत सुर्यवंशी कुटुंबीयांना केली आहे.  


ता.२७ मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हेर परिसरात जोराचे वादळ सुटले होते. त्यात अचानक सुर्यवंशी यांच्या घराला आग लागुन अख्खे घर जळुन खाक झाले होते व अंगणात बांधलेली एक म्हैस आगीत दगावली होती. त्यामुळे सुर्यवंशी यांचा पुर्ण संसारच उघड्यावर आला आहे. याबाबत प्रशासनाने पंचनामा करून शासनाकडे अहवाल सादर केला होता. परंतु शासनाकडून अद्याप मदत मिळाली नाही. सोमवारी (ता.३०) वैद्यकीय अधिकारी रवि वाघमारे, डॉ. संजय सांडोळकर, दैवशाला मुंडे, राजकुमार तवंडे यांनी संतोष सुर्यवंशी यांना संसार उपयोगी साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी दाखवली आहे.  यावेळी ग्रामविकास अधिकारी बाबुराव मुसळे, अविनाश सुर्यवंशी यांच्यासह सुर्यवंशी कुटुंबीय उपस्थित होते.  दरम्यान ही मदत सामाजिक बांधिलकी म्हणून  असुन याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवुन दिला आहे. पाठपुरावा चालु आहे व लवकरच  शासनाकडून मदत  मिळणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com