Accident News : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक; तीन ठार, दोन जखमी

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात
samruddhi mahamarg car truck accident three dies two injured police
samruddhi mahamarg car truck accident three dies two injured policesakal

वैजापूर : समृद्धी महामार्गावर भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं कार मधील तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास लासुर स्टेशन जवळ असलेल्या हडस पिंपळगाव (ता. वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर) घडली.

samruddhi mahamarg car truck accident three dies two injured police
Accident News: समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, आईवडिलांसमोरच मुलाने सोडला जीव

धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये पती, पत्नी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.दरम्यान, या घटनेत अख्ख कुटुंबचं संपल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. यातील जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अनिल राठोड आणि भाग्यश्री राठोड असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. तर त्यांच्या मुलाचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

samruddhi mahamarg car truck accident three dies two injured police
Pune Accident News : कंटेनरला धडक दिल्यामुळे लातूरच्या तरुणाचा मृत्यू

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आज पुन्हा सोमवारी रात्री समृद्धी महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला.हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर लासुर स्टेशन येथे हडस पिंपळगावजवळ शिर्डीहून नागपूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली.

samruddhi mahamarg car truck accident three dies two injured police
Accident : समृद्धी महामार्गावर अपघात; महिलेचा मृत्यू

यामध्ये पती-पत्नी आणि एक लहान मुलगा जागीच ठार झाला तर दोन मुले जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com