
समृध्दीच्या कामासाठी धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे या रस्त्यांशी अक्षरशा चाळण झाली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांप्रमाणचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मतदारंसघातील 120 कि.मी. भागातील रस्ते देखील यात बाधित झाले आहेत.
औरंगाबाद : पहिल्यांदाच आमदार झालेले शिवसेनेचे वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी पहिल्याच अधिवेशनात वैजापूर मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला. समृद्धी महामार्ग वैजापूर तालुक्यातील 17 गांवामधून जातो. या कामामुळे या गावांतील अंतर्गत रस्त्यांचे मात्र नुकसान झाल्याचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला.
महाआघाडी सरकारचे नागपूरमधील अधिवेशन सहाच दिवसांचे असल्यामुळे नवनिर्वाचित आमदारांना बोलण्याची किती संधी मिळेल, याबद्दल शंकाच होती. पण वैजापूरचे आमदार प्रा. बोरनारे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत मतदारसंघातील महत्वाच्या दोन प्रश्नांबद्दल आवाज उठवला.
क्लिक करा : माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रा. बोरनारे म्हणाले, नागपूर-मुंबई या समृध्दी महामर्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आणि या मार्गाचे काम मुदतीआधी पुर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचे निश्चितच स्वागत आहे. महाराष्ट्राच्या विकासात समृध्दी महामार्ग हा मैलाचा दगड ठरू शकतो. पंरतु हा मार्ग करत असतांना वैजापूर तालुक्यातील 17 गांवामधून हा मार्ग जाणार आहे. सध्या समृध्दीचे काम सुरू असून त्यासाठी येणाऱ्या वाळू, खडी, सिमेंट, लोखंड आदीच्या ट्रक या मतदारसंघातील सतरा गावांच्या जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरून धावत आहेत.
आम्ही निधी आणून केलेले रस्ते झाले खराब
परिणामी या सतरा गावांतील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मी जिल्हा परिषद सदस्य असल्याने माझ्यासह इतर सदस्यांनी रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून हे रस्ते केले होते. मात्र समृध्दीच्या कामासाठी धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे या रस्त्यांशी अक्षरशा चाळण झाली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांप्रमाणचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मतदारंसघातील 120 कि.मी. भागातील रस्ते देखील यात बाधित झाले आहेत. माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर संबंधित विभागाने मला ही माहिती दिली.
हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले !
समृध्दी महामार्गाचे काम झालेच पाहिजे, पण त्या सोबतच ग्रामीण भागातील ज्या रस्त्यांची वाईट अवस्था या कामसाठी धावणाऱ्या ट्रक आणि हायवामुळे झाली आहे, त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कोण देणार? असा सवाल बोरनारे यांनी सभागृहात उपस्थित केला. नुकसान झालेल्या रस्त्यांच्या कामासाठी शासनाने अतिरिक्त निधी द्यावा अशी मागणी देखील बोरनारे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे शासनाकडे केली.
सिंचन योजनेला निधी द्या..
मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित करतांनाच चाळीस गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाची असलेली रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना पुर्णपणे कार्यन्वीत करण्यासाठी आवश्यक निधी द्यावा अशी मागणी देखील बोरनारे यांनी यावेळी केली. मागच्या सरकारने या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी 5 कोटी 80 लाखांचा निधी दिला होता.
उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी?
यातील 4 कोटी 79 लाख रुपये खर्च होऊन देखील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वीत होऊ शकलेली नाही. वीज बील भरून झालेल्या कामांची चाचणी घेण्यासाठी 42 लाखांच्या निधीची तातडीने गरज आहे. याशिवाय आणखी निधीची गरज असल्याने शासनाने याकडे तातडीन लक्ष द्यावे, जेणेकरून वैजापूर तालुक्यातील चाळीस गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल असेही बोरनारे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
हेही वाचा - Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी
क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी
मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...