फुलंब्रीत समता परिषदेचा जल्लोष 

नवनाथ इधाटे
रविवार, 6 मे 2018

समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा पार्वतीबाई शिरसाठ  यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

फुलंब्री : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांची नुकतीच न्यायालयाने जामीनवर सुटका केल्याने फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात समता परिषदेच्या वतीने शनिवारी (ता.पाच) रोजी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.

समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा पार्वतीबाई शिरसाठ  यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलतांना श्री.शिरसाठ म्हणाल्या की, राजकीय सुडापोटी भुजबळ साहेबाना कारागृहात ठेवले होते. परंतु आमचा सर्वांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याने शेवटी आम्हाला न्याय मिळाला. भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात समता परिषद समाजाला न्याय देण्यासाठी लढणार आहे.

यावेळी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष देविदास ढंगारे, नगराअध्यक्ष सुहास शिरसाठ, योगेश मिसाळ, संजय कुदळे, शामराव जाधव, चंद्रकांत शिरसाठ, दामोदर पाथ्रे, रंगनाथ शिरसाठ,  रंगनाथ हापत विठ्ठल वाघमारे, भाकचंद चोपडे, बारकु रघु, हारीचंद वाघ, विजय रघु, आजिनाथ चोपडे, पंडित नागरे, गणेश राऊत अजय शेरकर,  एकनाथ ढोके, संतोश जाधव,सोमनाथ रसाळ आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: samta parishad celebration in Phulambri

टॅग्स