Sanatan-Sanstha
Sanatan-Sanstha

सनातन व हिंदू जनजागृती समितीचा मोर्चा

औरंगाबाद - "सनातन संस्थेवर बंदीची मागणी बंद करा', "सनातनच्या साधकांचा छळ बंद करा' अशा घोषणा देत सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे शहरातून रविवारी (ता. दोन) मोर्चा काढण्यात आला. यात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह अन्य विचारवंतांच्या हत्येप्रकरणी पकडण्यात आलेले आरोपी सनातनचे साधक नाहीत. त्यामुळे निर्दोष साधकांना छळू नका. सनातन संस्थेवरील बंदीची मागणी अन्याय्य आहे, असा दावा मोर्चात सहभागी झालेल्या साधक प्रियांका लोणे यांनी केला.

समर्थनगर येथील सावरकर चौकातून प्रारंभ झालेल्या या मोर्चात सनातनसह हिंदू जनजागृती समिती, हिंदू विधिज्ञ परिषद, वारकरी संप्रदाय, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान, रणरागिणी शाखा, राजमुद्रा ग्रुप, स्वराज्य मित्रमंडळ यांसह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com