तलाठ्यास बाजूला करत रेतीचा ट्रॅक्टर पळविला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पंचनामा करताना तलाठ्यास उचलून बाजूला टाकत ट्रॅक्‍टरसह पळ काढणार्‍या दहा जणांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ( ता.१० ) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ भागातून काही ट्रॅक्टरमध्ये बेकायदेशीर रेती वाहतूक केली जात असल्याची माहिती तलाठी विठ्ठलराव शेळके यांना मिळाली होती. त्यावरून शेळके यांनी शिरड शहापूर येथे दोन ट्रॅक्टर थांबवून चौकशी सुरू केली. यात दोन ट्रॅक्टर मध्ये सहा ब्रास रेती आढळून आली. यावेळी चालकांनी ट्रॅक्टरमालक व इतरांना दूरध्वनी करून घटनास्थळी बोलावले. याठिकाणी जमलेल्या दहा जणांनी तलाठी शेळके यांना पंचनामा करू दिला नाही.

तसेच त्यांना उचलून बाजूला नेऊन टाकले. त्यानंतर ट्रॅक्टरसह पळ काढला. याप्रकरणी शेळके यांच्या तक्रारीवरून अक्षय संभाजी कदम, राजू पंडितराव राखुंडे, निखिल चिंतामण गोपणपल्ले, ज्ञानेश्वर राखुंडे, व अन्य सहा जणांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Sand tractor escaped from Aundha Taluka