जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यातून चंदनचोरी करणारे दोघे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यातून चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी (ता. एक) पहाटे बेड्या ठोकल्या. आडगाव माऊली येथे पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवेळी ही कारवाई करण्यात आली.  

मुनीर रशीदखान ऊर्फ कुऱ्या (वय ३३) व आसिफ जमादार जोनवाल (वय २६, रा. आडगाव माऊली) अशी संशयितांची नावे आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी कामानिमित्त शहराबाहेर असताना २७ जुलैला रात्री त्यांच्या शासकीय बंगल्याच्या आवारात उड्या टाकून या दोघांनी चंदनाची तीन झाडे इलेक्‍ट्रिक कटरद्वारे कापून नेली होती. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. 

चंदनचोरी प्रकरणात आडगाव माऊली (ता. औरंगाबाद) येथील सराईत चंदनचोरांनी ही चोरी केल्याची बाब गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांना समजली. त्यांनी मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे आडगाव माऊली येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवत संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अफरोज शेख, विजय पवार, सहायक फौजदार नजीरखान, तुकाराम राठोड, नवाब शेख, वीरेश बने, ज्ञानेश्वर ठाकूर, बबन इप्पर, प्रमोद चव्हाण, अप्पासाहेब खिल्लारे, मच्छिंद्र ससाणे, विजय पिंपळे, गोविंद पचरंडे, किरण गावंडे, हिरासिंग राजपूत, जयश्री फुके यांनी केली.

खरेदी करणारा पसार
संशयित चंदनचोर मुनीर व आसिफ दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यांनी झाडांचे खोड आडगाव माऊली येथील इलियाजखान नजीरखान याला विक्री केले. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान इलियाजचे घर गाठले. मात्र त्यापूर्वीच तो मागच्या दाराने पसार झाला होता. पोलिसांनी घरझडती घेत पावणेदोन लाखांचे सत्तर किलो चंदन जप्त केले.

Web Title: sandle theft crime