महापालिकेचे उद्यान नव्हे, हे तर जंगल!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - देखभाल दुरुस्तीअभावी शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. वाढलेले गवत, झाडेझुडपे, घाण यामुळे नागरिकांना उद्यानात पाय ठेवणेही अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी (ता. १७) उद्यानात प्राण्यांची चित्रे लावून महापालिकेचा निषेध केला. 

नागरिकांना उद्यानामध्ये जाऊन मोकळी हवा घेता यावी, लहान मुलांना बागडता यावे, यासाठी किरकोळ सुविधा असाव्यात एवढी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्यानांची वाट लागली आहे.

सिडकोतील वॉर्ड क्रमांक ८० मध्ये एन-तीन, एन-चार, गुरू सहानीनगर, पारिजातनगर येथील उद्यानांची साफसफाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. एन-तीन सिडको येथील प्लॉट क्रमांक ४४० च्या मागील मोकळी जागा, एन-चारमधील स्वामी विवेकानंद उद्यान, एन-तीनमधील किटली गार्डनसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. सर्वत्र अस्वच्छता असल्यामुळे नागरिक येथे फिरू शकत नाहीत. अनेकवेळा येथे सापही निघतात. त्यामुळे उद्याने, मोकळ्या जागा आता जंगल झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी प्राण्यांचे चित्र लावून नागरिकांनी निषेध केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sane Guruji garden Municipal Forest