परभणी- खासदार संजय जाधव यांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

परभणी : येत्या 19 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामाचे उदघाटन केले जाणार आहे. परंतू या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार व आमदारांना विश्वासात घेतल्या गेले नाही, त्यामुळे हा कार्यक्रम शासकीय आहे की भाजपचा आहे असा प्रश्न उपस्थित करत या कार्यक्रमावर आपण बहिष्कार टाकणार असल्याची माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

हा कार्यक्रम शासकीय असल्याने या कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यासह स्थानिक लोकप्रतिनिधीना विश्वासात घेणे क्रमप्राप्त होते. परंतू आम्हाला कोणाताही निरोप नाही. त्यामुळे या कार्यक्रमास आम्ही हजर रहाणार नाही. शासकीय कार्यक्रम असल्याने जिल्हाधिकाऱ्यांवर याची जबबादारी आहे. लोकप्रतिनिधीचा अवमान केल्या प्रकरणी आपण हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची उचलबांगडी झाली पाहिजे असे ते म्हणाले.

Web Title: sanjay jadhao will not attend program of chief minister in parbhani