esakal | हिंगोली पंचायत समितीच्या सभापतीपदी संजीवनी दिपके बिनविरोध

बोलून बातमी शोधा

पंचायत समिती सभापती
हिंगोली पंचायत समितीच्या सभापतीपदी संजीवनी दिपके बिनविरोध
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : येथील पंचायत समितीच्या सभापती पदासाठी मंगळवारी (ता. चार) झालेल्या निवडीत महाविकास आघाडीच्या संजीवनी पंडितराव दिपके यांची बिनविरोध निवड झाली. हिंगोली पंचायत समितीत (Hingoli panchayat samiti)महाविकास आघाडीची सत्ता आहे. मागील महिन्यात शिवसेनेच्या सुमनबाई झुळझुळे यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief executive officer) राधाबीनोद शर्मा यांच्याकडे राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी मंगळवारी झालेल्या निवड प्रक्रियेत शिवसेनेच्या संजीवनी दिपके (Sanjivani deepke)यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड पिठासन अधिकारी अतुल चोरमारे यांनी केली आहे. Sanjeevani Deepke unopposed as the Chairman of Hingoli Panchayat Samiti

हेही वाचा - दिलासादायक : नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सभापती निवडीच्या प्रक्रियेला येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १० ते १२ यावेळेत नामनिर्देशन अर्ज सादर करण्यासाठी वेळ दिला होता. मात्र यावेळेत एकच अर्ज दाखल झाला होता. त्यानंतर दुपारी दोन वाजता सभागृहात सर्व सदस्य कोरोना नियमाचे पालन करीत जमले होते. बरोबर दोन वाजता पिठासन अधिकारी अतुल चोरमारे, गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे यांनी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार संजीवनी दिपके यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करताच सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित सभापती संजीवनी दिपके यांचा सत्कार केला. यावेळी आमदार संतोष बांगर, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, नगरसेवक राम कदम, परमेश्वर मांडगे यांनी देखील त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती

निर्वाचन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे ,गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे, नायब तहसीलदार एस. आर. जिरंगे, सहाय्यक गटविकास अधिकारी जी. पी. बोथीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. या प्रक्रियेसाठी प्रशांत बोरसे, सी. आर. गोळेगावकर, मुकुंद कारेगावकर यांनी पुढाकार घेतला. यावेळी बाजीराव जुमडे, दतराव कडतीकर, भास्कर बेंगाळ, पंढरीनाथ ढाले, रुपाजी कऱ्हाळे, रंगनाथ पाटील, संगीता गंगावणे, संध्या भगत, कावेरी कऱ्हाळे, मुक्ता गोरे, गंगाबाई गावंडे आदींची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

https://www.youtube.com/watch?v=eTfPn1xHlkI