हजारो पणत्या पेटवून संत नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा | Sant Namdeo Maharaj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Namdeo Maharaj Birth Anniversary Celebration
हजारो पणत्या पेटवून संत नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा

हजारो पणत्या पेटवून संत नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव (Sant Namdeo) येथे कार्तिक एकादशीला संत नामदेव महाराज यांचा ७५१ वा जन्मोत्सव सोहळा सोमवारी (ता.१५) सकाळी साडेसहा वाजता मोठ्या भक्तिमय वातावरणात हजारों पणत्या पेटवून साजरा करण्यात आला. श्री संत नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा (Sant Namdeo Maharaj) संत नामदेव महाराज मंदिर संस्थान व परिसरातील भाविकांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता संत नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव मंदिर परिसरात पणत्या पेटवून साजरा करण्यात आला तर सकाळी सात वाजता संत नामदेव महाराज यांच्या वस्त्र समाधीस संस्थानचे अध्यक्ष नवनाथ वगवाड सपत्नीक यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, सचिव सुभाष हुले, रामराव सोळंके, भारत महाराज, नवसाजी गुगळे, डॉ.गोपाल बाहेती व नर्सीसह पंचक्रोशीतील हजारो (Hingoli) भाविक उपस्थित होते.

Sant Namdeo Maharaj Temple, Namdeo Narsi

Sant Namdeo Maharaj Temple, Namdeo Narsi

हेही वाचा: प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी

यावेळी सकाळी मंदिर परिसरात तसेच घाटपरिसरात हजारो पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मंदिरामध्ये श्री संत नामदेव महाराज यांच्या रांगोळी व फुलातून आकर्षक प्रतिमा काढण्यात आली होती. तसेच श्री संत नामदेव महाराज यांच्या मंदिरावर सुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी सकाळी मंदिर परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. जन्मोत्सवानिमित्त आरती, भजन कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. जन्मोत्सव सोहळ्याला नर्सीसह परिसरातील हजारो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.

loading image
go to top