पुढील वर्षांपासून सुरू होणार संत विद्यापीठ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पैठण येथील संत विद्यापीठ पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात मंगळवारी (ता. 10) नागपूर येथे बैठक घेण्यात आली. या वेळी विद्यापीठाचे संलग्नीकरण (ऍफिलेशन) मिळवून घेण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रस्ताव दाखल करण्याचा व ही जबाबदारी माजी महापौर संजय जोशी यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात 10 ऑक्‍टोबरला पुढील बैठक होणार आहे. 

पैठण येथील संत विद्यापीठाचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. इमारतीचे भूमीपूजनही झाले. मात्र अद्याप विद्यापीठ सुरू झालेले नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी नागपूर येथे विधानभवनात बैठक घेतली. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, संबंधित विभागाचे सचिव, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, आमदार संदीपान भुमरे, माजी उपमहापौर संजय जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर तसेच वारकरी मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत कोणत्याही परिस्थितीत पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय झाला.

केंद्राने संलग्नीकरण न दिल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वर्ग सुरू करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. संत विद्यापीठासाठी राज्याकडून केंद्राकडे तातडीने प्रस्ताव पाठवला जाणार असून, हे संलग्नीकरण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी श्री. जोशी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Web Title: sant vidyapeeth starts from next year