भाजप जिल्हाध्यक्षपदी पुन्हा संतोष दानवे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

जालनाः भारतीय जनता पक्षाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी आमदार संतोष दानवे यांची एकमताने पुन्हा निवड झाली. संभाजीनगर येथील भाजपाच्या कार्यालयात सोमवारी (ता.१३) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, निवडणूक निर्णय अधिकारी किशोर शितोळे, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुक, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडप्रक्रिया पार पडली.

जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार संतोष दानवे यांचा एकमेव उमेद्वारी अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जासाठी जितेंद्र पालकर यांनी सूचक म्हणून नाव सुचवले. भिमराव भुजंग, विलास नाईक यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर निवडणूक अधिकारी किशोर शितोळे यांनी संतोष दानवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले

बोंडअळीचा ठिय्या, कपीशी गेली वाया

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख, बद्रिनाथ पठाडे, शहराध्यक्ष राजेश राऊत, बसवराज मंगरुळे, तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर, भिमराव भुजंग, राजेंद्र देसमुख, सुरेश दिवटे आदींची उपस्थिती होती.

नूतन पदाधीकाऱ्यांना शुभेच्छा देताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना शहरात पक्ष वाढवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. पक्षात अध्यक्ष व उपाध्यक्ष ही व्यवस्था आहे; परंतु निर्णय प्रक्रियेत जिल्हा कोअर कमिटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेत असतो. आगामी निवजणूकीत भाजप जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष बनविन्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत; तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून केंद्र शासन राबवक असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोचविन्याचे आवाहनही श्री. दानवे यांनी केले.

मिस्त्रीनेही घेतली बक्षीस म्हणून लाच...

 महेश निकम, शशिकांत घेगे, सुनिल राठी, योगेस लाहने, शिवाजीराव जाधव, संतो, खंडेलवाल, सुभाष सले, सोपान पेंढारकर, शिवाजीराव नारीयलवाले, मयूर ठाकूर, रवी अग्रवाल, संतोष कदम, संजय आटोळे, संजय डोंगरे, राधाकिसन काटे आदींची उपस्थीती होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Santosh Danve re-elected as BJP district president