Vidhan sabha 2019 : संतोष दानवे यांनी भरला उमेदवारी अर्ज

तुषार पाटील
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

शक्ती प्रदर्शनासह शहरातून फेरी

भोकरदन (जि. जालना) - भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष संतोष दानवे यांनी आज मतदार संघातील दोन ज्येष्ठ शेतकऱ्यांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. 

यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. श्री. दानवे यांनी सकाळीच झोपड्या जवखेडा या आपल्या मूळ गावी जाऊन पूर्वजांचे आशीर्वाद घेतले. आराध्य दैवत असणार्‍या राजुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. तेथे महाभिषेक केला व विजयासाठी प्रार्थना केली त्यांच्यासोबत पत्नी रेणू दानवे त्यांचे सासरे
राजेश सरकटे उपस्थित होते. 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठ्या शक्ती प्रदर्शनासह शहरातून त्यांनी फेरी काढली. यावेळी रथात अर्जुन खोतकर, अनिरुद्ध खोतकर व शिवसेनेचे
पदाधिकारी होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Santosh Danve's Filled Candidate Application Form