सारोळा-लिहाखेडी रस्त्याची चाळणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे शुक्‍लकाष्ट संपलेले नाही. बंद पडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र नियम धाब्यावर ठेवून गौण खनिजाचा होणार उपसा नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या रस्त्यावर दिवाळी सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहने फसल्यामुळे रस्त्याची ओरड झाली.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे शुक्‍लकाष्ट संपलेले नाही. बंद पडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र नियम धाब्यावर ठेवून गौण खनिजाचा होणार उपसा नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या रस्त्यावर दिवाळी सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहने फसल्यामुळे रस्त्याची ओरड झाली.

दिल्ली दरबारी रस्त्याचा प्रश्न गेल्यानंतर रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. आता घाईगडबडीत रस्त्याचे काम सुरू झाले असतांना रस्त्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजाचा दर्जा निकृष्ट आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ढूंकूनही पाहत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातही गौण खनिजाचा वारेमाप होणारा उपसाकडे महसूल विभागाचे अधिकारी काणाडोळा करित आहे. सारोळा येथील गट क्रमांक 147 मधील खडी केंद्रातून वारेमाप उपसा होत आहे. अवजड वाहनांच्या रहदारीमुळे सारोळा ते लिहाखेडी रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यावरून चालणे कठिण झाल्यामुळे सारोळा येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर येथून सुरू असलेली खडीची
वाहने बुधवारी (ता.13) अडवून ठेवली होती. विकासाची कामे होत असतांना त्याच्या दुसऱ्या बाजूचे वास्तव कसे असते. याचा प्रत्यय सारोळा परिसरातील ग्रामस्थांना येत आहे.

नियमबाह्य पद्धतीने गौणखनिजाचा उपसा
सारोळा शिवारात राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गट क्रमांक 147 मधील 3 हेक्‍टर जमिनीमध्ये खदाणीसाठी महसूल विभागाने नियम व अटी ठेवून कंत्राटदारास परवानगी दिली. यामध्ये प्रामुख्याने खानपट्टाधारकाने गौण खनिजाचे उत्खनन करण्याची जागा सीमांकित करून त्याच्या सर्व बाजूने कठडे व तारेचे कुंपण उभे करणे बंधनकारक केले होते. प्रत्यक्षात मात्र हा महत्वाचा नियमच संबंधित कंत्राटदाराने धाब्यावर ठेवून उत्खनन सुरू ठेवले आहे.

शेतकऱ्यांचे होणार नुकसान
खदाणीतून गौणखनिजाचा उपसा करताना परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता कंत्राटदाराने घेणे आवश्‍यक होते. परंतु या परिसरात शेतकऱ्याने तयार केलेल्या मातीनाला बांधच्या खालीच खदाणीतून उत्खनन सुरू आहे. त्यामुळे या मातीनाला बांधामध्ये साचलेले पाणी झिरपून शेतकऱ्यांची ओलिताखाली आलेल्या जमिनीचे मोठे नुकसान होणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarola-Lihakhedi Road Not Good Condition