सरपंचांनी करावे गावाचे दारिद्र्य दूर : सरपंच परिषदेत भापकर याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : सरपंच, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक गावाच्या विकासातील महत्वाचे घटक आहेत. आपापल्या गावाची वेदना, दुख दूर करण्याचे महत्वाचे काम तुमच्या हातात आहे. शेतकऱ्यांचे सबलीकरण व्हावे व शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी सरपंचांनी गावा-गावात मनरेगावर भर द्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित औरंगाबाद जिल्हा सरपंच, पोलीस पाटील संकल्प परिषदेत ते बोलत होते. 

परिषदेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना औरंगाबाद जिल्हा सरपंच, पोलीस पाटील संकल्प परिषदेच्या वतीने त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परिषदेत सर्व सत्कार टाळत वाजपेयींच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी मंत्री गंगाधर गाडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, प्राचार्या सुर्यकांता गाडे, शेकापचे विकास शिंदे, आदींची प्रमुख उपस्तीती होती. यावेळी सरपंच परिषदेचे मुख्य संयोजक मिलिंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. परिषदेत जागतिक कीर्तीचे सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी कीर्तन सादर करून प्रबोधन केले.

 यावेळी उदघाटनपर भाषणात आपले विचार मांडताना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन पातळीवर योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे सबलीकरण होण्यासाठी मराठवाड्यात शेततळे, रेशीम आणि पीक उत्पादनातून शेतकऱ्यांचा विकास साधण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध योजना राबवून प्रशासन गावपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. सरपंचांनी ग्रामसभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधावा असेही आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. गावा गावात सुशिक्षित बेरोजगारांना स्वयं रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी विभागीय आयुक्तालयाच्या वतीने योजना राबविण्यात येत आहे याचा लाभ तरुणांनी घ्यावा असे डॉ. भापकर म्हणाले. विकास शिंदे यांनी सरपंच व पोलिस पाटलांच्या मागण्या मांडल्या.

Web Title: Sarpanch should romove with the poverty of the village