सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१८- १९ संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. महिंद्रकर, ईसीएचएस नांदेडचे अधिकारी मेजर ब. थापा यांची प्रमुख उपस्थिती होती.   

सन २०१७- १८ साठी शासनाने जिल्ह्यासाठी ३५ लाख ५० हजार ५१२ रुपये  एवढे उद्दिष्ट दिले होते. ते जिल्ह्याने ४६ लाख ८८ हजार रुपये जमा करुन १३२ टक्के पुर्ण केले आहे. तसेच वर्ष २०१८- १९ साठी देखील शासनाकडुन ३५ लाख ५० हजार ५१२ रुपये एवढे उद्दिष्ट मिळाले असून ते डिसेंबर २०१८ मध्ये दुप्प्टीने निधी जमा करुन पुर्ण करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी परदेशी यांनी  सांगितले.   

या संकलनात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा  तथा महाविद्यालयांनी  सहकार्य केले आहे. यापुढे सुद्धा त्यांना दिलेले उद्दिष्ट वेळेतच पूर्ण करु अशी खात्री जिल्ह्यातील कार्यालयांनी दिली. या प्रसंगी उत्कृष्ट संकलन करणाऱ्या कार्यालयांना प्रशस्तीपत्र, सैनिकाबाबत महत्व असणारे विषयाचे व इतर कार्यालयीन उपयुक्त पुस्तके  भेटवस्तू म्हणून देण्यात आली.

प्रास्ताविक सैनिक कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलीत झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती दिली. सुरुवातीला शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील वीरनारी, वीरपिता यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्तीचे व इतर आर्थीक मदतीचे एक लाख २८ हजार रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले. 

Web Title: sashatra sena dhwajdin fund collection starts