औरंगाबाद : सातारा रजिस्ट्री कार्यालयातील व्यवहार सुरू राहणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मे 2019

सातारा परिसरातील बीड बायपासवरील पटेल लॉन्स समोरील एका कॉम्प्लेक्‍समध्ये मागील काही वर्षांपासून सुरू असलेले रजिस्ट्री ऑफिस पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे सुरू राहाणार असल्याची माहिती या कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

औरंगाबाद - सातारा परिसरातील बीड बायपासवरील पटेल लॉन्स समोरील एका कॉम्प्लेक्‍समध्ये मागील काही वर्षांपासून सुरू असलेले रजिस्ट्री ऑफिस पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे सुरू राहाणार असल्याची माहिती या कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

 मागील काही दिवसांपासून बीड बाय पास रस्त्यावर सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी रस्त्यामध्ये बाधीत होणाऱ्या मालमत्तांची महापालिकेच्या विशेष अतिक्रमण हटाव पथकातर्फे पाडापाडी करण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विविध खासगी मालमत्ता, व्यापारपेठा तसेच काही बहुमजली इमारतींचे मजले पाडण्यात आले. त्यामध्ये सातारा येथील रजिस्ट्री कार्यालयाचा सर्व्हिस रोडमध्ये येणारा भाग देखील बाधीत झाला; परंतु महापालिकेतर्फे मार्किग करण्यात आलेला भाग रजिस्ट्री कार्यालयाच्या जागा मालकातर्फे स्वत: पाडून घेण्यात येत आहे. त्यामुळे पाडापाडीचे मटेरीयल रस्त्यावर तसेच कॉम्प्लेक्‍सच्या परिसरातच ताप्तुरत्या स्वरूपात टाकले जात आहे.

परंतु, यामुळे या कार्यालयात रजिस्ट्रीसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सातारा येथील रजिस्ट्री कार्यालय बंद होणार की काय असा संभ्रम निर्माण होत आहे. या विषयी काही नागरिकांनी रजिस्ट्री कार्यालयातील अधिकृत सूत्रांशी चर्चा केली असता सातारा येथील रजिस्ट्री कार्यालय पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन रजिस्ट्री कार्यालयांचे नागरिकांच्या सोयीसाठीच या ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Parisar Registry office will continue