शिवसेनेचे सत्यशोधन आंदोलन 

मधुकर कांबळे
सोमवार, 9 जुलै 2018

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, पिक कर्ज तसेच शासनाने केलेल्या विविध घोषणांचा खरोखर शेतकऱ्यांना लाभ मिळाले आहे किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी ( ता.9) सिडको परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या क्षेत्रीय कार्यालय परिहसरातील जिल्हा अग्रणी बँकेसमोर सत्यशोधन आंदोलन सुरू आहे.  

बँकेच्या अधिकार्यांना बाहेर बोलाऊन जमीनीवर बसवुन आंदोलकांनी चर्चा झाली. जिल्हाभरात आज आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी फसवी कर्जमाफी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भांडवलदार धार्जिण्या बँकांचा धिक्कार असो, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना योजनेचा आतापर्यंत फक्त 40 टक्के शेतकर्यांना फायदा झाला आहे, आणि तोही स्वरूपाच्या आहे. शेतकरी सन्मान योजनेपासून अद्यापही 60 टक्के शेतकरी वंचित आहेत. सरकारचे जे दावे करत आहेत ते सगळे खोटे आहेत. ही योजना जाहीर होऊन एक वर्ष झाले परंतु, या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांचे वर्षभराचे व्याज कोण भरणार असा सवाल केला. 

या सरकारने केलेल्या अनेक घोषणा या खोट्या आणि फसव्या आहेत असा आरोप केला. सरकरने जाहीर केलेल्या सर्वच योजनांचा खरैखर लोकांना फायदा झाला आहे का याची आम्ही माहिती घेऊ असे त्यांनी सांगितले.

Web Title: Satyashodhan movement by Shivsena