हिंगोली पालिका पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या सविता जयस्वाल विजयी

मंगेश शेवाळकर
सोमवार, 24 जून 2019

हिंगोली : हिंगोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरामधील पोटनिवडणुकीत  शिवसेनेच्या सविता अतुल जैस्वाल  या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयाची घोषणा सोमवारी (ता. 24) मतमोजणीनंतर लगेच करण्यात आली.

हिंगोली : हिंगोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरामधील पोटनिवडणुकीत  शिवसेनेच्या सविता अतुल जैस्वाल  या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयाची घोषणा सोमवारी (ता. 24) मतमोजणीनंतर लगेच करण्यात आली.

येथील नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरा मधील नगरसेविका लताबाई नाईक यांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून नगरसेविका पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या सविता जयस्वाल, राष्ट्रवादीच्या अश्विनी बांगर तर अपक्ष म्हणून शेख सादेकबी बेलदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. रविवारी (ता. 23) शहरातील चार मतदान केंद्रावर 4899 मतदारांपैकी 2386 मतदारांनी मतदान केले होते. 

दरम्यान आज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतुल चोरमारे पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण मंडपम येथे मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी साडेदहा वाजता निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये शिवसेनेच्या सविता जयस्वाल यांना 1450 मते, राष्ट्रवादीच्या अश्विनी बांगर यांना 793 मते तर अपक्ष शेख सादेकबी बेलदार यांना 62 मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या श्रीमती जयस्वाल विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या विजयाची घोषणा होताच शिवसेना-भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savita Jayswal form shivsena wins Hingoli MC Bypolls