VIDEO : लव यू म्हणत तो घुसला पोलिसांच्याच गाडीखाली, नंतर झाले असे...

अतुल पाटील
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

  • उद्यानाबाहेर नशेखोराचा धुमाकूळ 
  • लहान मुलांना केली जबर मारहाण 
  • दगड स्वत:च्याच अंगावरच टाकले 
  • पोलिसांनी चोप देत घेतले ताब्यात  

औरंगाबाद - लहान मुलांना जबर मारहाण. सगळ्या दुचाकीही पाडल्या. त्यानंतर मोठा दगड उचलून स्वत:च्या पाठीवर वारंवार टाकला. ये-जा करणाऱ्या वाहनांसमोरही आडवा झाला. एवढे कमी कि काय? तो पुन्हा पोलिस वाहनाच्या टायरखाली घुसला. हा सारा प्रकार सिडको, एन-आठ येथील नेहरु उद्यानासमोर घडला. त्यानंतर मात्र, त्याला पोलिसांचा पाहुणचार मिळाला. शिवाय पोलिस ठाण्यात नेऊन डांबले. 

नेहरू उद्यानाबाहेर मंगळवारी (ता. दहा) सायंकाळी सव्वा पाच वाजता एका नशेखोर तरुणाने सुरवातीला लहान मुलांना मारहाण केली. बाजूलाच असलेल्या दारू दुकानासमोर जाऊन लोकांना शिव्या दिल्या. तिथून उतरत रस्त्याने जाणाऱ्या वाहनांसमोरही आडवे जात वाहने अडवली. पुन्हा त्याने आपला मोर्चा उद्यानात फिरायला आलेल्या लोकांच्या वाहनाकडे वळविला.
उद्यानाबाहेरील सगळ्याच दुचाकी पाडत दहशत निर्माण केली. त्यानंतर आलेल्या पोलिसांनी त्याला लगाम घातला. 

जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? 

पोलिसांना म्हटला लव यू.. 
घटनास्थळी आलेल्या दोन पोलिसांना तो आवरणे शक्‍य नव्हते. वाहनही बोलावण्यात आले. तो सतत शिव्या देत लोकांच्या अंगावर धावून जात होता. त्यामुळे पोलिसांना त्यांचा खाक्‍या दाखवावा लागला. त्यानंतर  लव यू म्हणत पोलिसांचे पाय धरु लागला. लोक जास्तीचे जमा झाल्यानंतर उद्यानाच्या भिंतीशेजारील एक मोठा दगड उचलून स्वत:च्यात अंगावर टाकत
राहिला. हे कृत्य तो सतत करत असताना पोलिसांची माफी मागण्याचे नाटकही करत होता. 

 

अरे बाप रे - प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता  

Image may contain: 2 people, people standing, people walking and outdoor

तो म्हटला इथेच मरतो... 
मद्यधुंद तरुणाचा सायंकाळी सव्वा पाच ते पावणेसहा वाजेपर्यंत धिंगाणा सुरुच होता. त्यानंतर त्याने रस्त्यावर जात वाहने अडवायला सुरु केली. वाहने थांबत नाहीत म्हटल्यावर सरळ रस्त्यावरच पालथा झोपला. पोलिसांनी पुन्हा रस्त्याकडेला ओढून आणले. त्यानंतर पोलिस वाहन आल्यानंतर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने लाथा मारायला सुरवात केली. पोलिसाचा मार चुकवण्यासाठी "आता इथेच मरतो" म्हणत तो पोलिस वाहनाच्या खाली घुसला. पोलिसांनी त्याला बाहेर ओढत गाडीत घातले आणि सिडको पोलिस ठाण्यात नेले. 

Image may contain: 1 person, standing and outdoor

पालकही धावले त्याच्या अंगावर.. 
उद्यानाबाहेर लहान मुलांना मारल्यानंतर ही घटना एका मुलाच्या पालकांना कळाली. तत्काळ धाव घेत तिथे आले. ते नशेखोर तरुणाच्या अंगावर धावूनही गेले. पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पालकांनी मुलाचा शोध घेत त्याला तिथून नेले. नेत असताना मुलगा प्रचंड रडत होता. पालक त्याला धीर देत होते. नशेखोर पोलिसांच्या स्वाधीन आहे म्हटल्यावर मुलाला
घेऊन ते तिथून निघून गेले. 

हेही वाचा - सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saying Love You He Rode Under A Police Car