एसबीआय बँकेला आग, एटीएम जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

०- अचानक बँकेलाआग, धावाधाव

०- बँक अधिकारी व पोलिसांनी रात्रीच भेट दिली

०- एटीएमसह अन्य साहित्य जलून खाक

०- अग्नीशमन दलाच्या बंबाने आगा आटोक्यात

परभणी : येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीनला मंगळवारी (ता.3) रात्री लागलेल्या आगीत एटीएम मशीन जळून खाक झाल्या आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

 

परभणी शहरातील नवीन जिल्हा परिषद इमारतीसमोर भारतीय स्टेट बँक आहे. हे या बँकेच्या बाजूलाच एटीएम व सिडीयम मशिन आहेत. या मशीनवर दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास या एटीएम मध्ये हे अचानक आग लागल्याचे परिसरातील लोकांच्या लक्षात आले. रात्री उशिरा असल्याने आग लागल्यानंतर जेव्हा आगीचे लोट एटीएम सेंटरच्या बाहेर पडत होते, तेव्हा लोकांच्या लक्षात आले. आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत एटीएम सेंटरमधील दोन सिडीयम मशिन आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. 

बँक अधिकारी व पोलिसांची घटनास्थळाला भेट 

परिसरातील लोकांनी तातडीने अग्निशमन दलास दूरध्वनीवरून संपर्क केला. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अर्धा ते एक तास ही आग विझविण्याचे काम सुरू होते. घटना रात्री उशीरा घडल्याने सकाळी लोकांना घटनेची माहिती कळाली. घटनास्थळास भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी नानलपेठ व नवा मोंढा पोलिसांचे पोलीस कर्मचारी यांनी भेटी देऊन घटनेची माहिती घेतली. स्थानिक नागरिकांनी आज विजवण्यासाठी मदत केली. सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या लोकांना एटीएम जळाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एटीएम समोर गर्दी जमली होती. या मशीन मध्ये किती रक्कम होती व त्या रकमेला हानी पोहोचली का याची माहिती भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी घेत आहेत. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा अंदाज बँकेच्या वतीने वर्तवण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI Bank burns down ATMs