धनंजय मुंडेंना सर्वाेच्च न्यायालयाचा दिलासा

dhananjay munde
dhananjay munde

अंबाजोगाई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ते धनंजय मुंडे यांच्यासह इतर 14 जणांवर  शुक्रवारी (ता. 14) बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या तीन दिवसापुर्वीच दिले होते. यांनतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी तक्रारदार राजाभाऊ फड हे रात्रभर बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये बसून होते. परंतु धनंजय मुंडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

जगमित्र साखर कारखान्यासाठी बेकायदेशीरपणे इनामी जमीन खरेदी केल्या प्रकरणी  राजाभाऊ फड यांच्या फिर्यादी वरुन २०११ मध्ये जगमित्र शुगर मिल्स प्रा.लि.साठी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पूस येथील जमीन खरेदी केली होती. ही जमीन बेलकुंडी मठाला इनाम दिलेली होती. मठाचे पूर्वीचे महंत रणजित व्यंकागिरी होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांनी जमिनीवर स्वत:च्या मालकीची परस्पर नोंद करून घेऊन त्या जमिनी विकल्या. शासनाची आणि न्यायालयाची दिशाभूल करत वेगवेगळे दावे दाखल करून ती जमीन स्वत:ची असल्याबाबत हुकूमनामे करून घेतले. या जमिनी इनामी असून त्यांची विक्री करता येणार नाही असे असतानाही वारसांनी खोट्या खरेदी खता आधारे जमिनीची विक्री केली.  

धनंजय मुंडे यांनी मुखत्यारनाम्याआधारे सदर जमिनी खरेदी केल्या आणि राजकीय वजन वापरत अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून सदर जमिनीचे खरेदीखत, फेरफार आणि एनए करून घेतला. खरेदीखत करताना कायदेशीर बाबींच्या पूर्तता करण्यात आल्या नाहीत. तसेच, पूस येथील ज्ञानोबा सीताराम कोळी यांचा मृत्यू झालेला असतानाही ते जिवंत आहेत असे दाखवून जमीन खरेदीसाठी त्यांच्या अंगठ्याचा ठसा संमतीपत्रावर लावलेला आहे. इनामी जमिनीच्या या बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून शासनाची फसवणूक करून करोडो रुपयांचा अपहार झाला असून सध्या ही सर्व जमीन जगमित्र शुगर मिल्सचे चेअरमन धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे असे राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीत नमूद आहे.

राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यासह चंद्रकांत रणजीत गिरी, ज्ञानोबा सीताराम कोळी, गोविंद सीताराम कोळी, बाबू सीताराम कोळी, उद्धव कचरू सावंत, माणिक तुकाराम भालेराव, विठ्ठल गणपतराव देशमुख, धोंडीराम अण्णा चव्हाण, दिगंबर वसंत पवार, राजश्री धनंजय मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे, वाल्मिक बाबुराव कराड आणि सूर्यभान हनुमंतराव मुंडे या १४ जणांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६८, ४६५, ४६४, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com