‘कॅशलेस’ने बसेल गैरव्यवहाराला पायबंद - अनिल पारसकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

बीड - कॅशलेस प्रणाली ही आर्थिक क्रांती असून त्यामुळे गैरव्यवहाराला पायबंद बसण्यास मदत होणार आहे. तसेच कुणीही कर भरण्यापासून व कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कॅशलेस प्रणालीचा वापर करावा व तो करताना जागरूकही राहावे, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले.

बीड - कॅशलेस प्रणाली ही आर्थिक क्रांती असून त्यामुळे गैरव्यवहाराला पायबंद बसण्यास मदत होणार आहे. तसेच कुणीही कर भरण्यापासून व कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कॅशलेस प्रणालीचा वापर करावा व तो करताना जागरूकही राहावे, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले.

येथील शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतूक शाखेच्या चौकीमध्ये वाहतुकीचा दंड कॅशलेसपद्धतीने भरण्यासाठी स्वाइप मशीन सेवा गुरुवारी (ता.२२) सुरू करण्यात आली. या वेळी उद्‌घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापक भरत राणे, सुरेश गुळवे, श्री. पाठक यांची उपस्थिती होती. या वेळी पोलिस अधीक्षक पारसकर पुढे म्हणाले, कॅशलेस अर्थव्यवस्थेचा सर्वांनी स्वीकार केला पाहिजे. पैशांच्या जोरावर सर्व क्षेत्रात तेथील यंत्रणेला विकत घेण्याचे गैरव्यवहार होतात. कॅशलेसमुळे हा प्रकार कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच नागरिकांनीही बॅंक खात्याची माहिती फोनवरून कोणालाही न सांगता ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे त्यांनी आवाहन केले. अतिरिक्त अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी प्रास्ताविकात नोटाबंदीनंतर शहर वाहतूक शाखेत सुरवातीला जुन्या नोटा दंड झालेल्या व्यक्तींकडून देण्यात येत होत्या. त्यानंतर कमी दंडासाठी थेट दोन हजारांची नोट देण्याचे अनुभव होते. त्यामुळे कॅशलेस सुविधा सुरू करण्यात आल्याचे सांगतानाच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास दंडच भरण्याची वेळ येणार नाही. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे भरत राणे यांनी या वेळी मशीनच्या वापराची माहिती दिली. पोलिस निरीक्षक सोपान निघोट यांनी आभार मानले. 

कॅशलेस दंडाची सुरवात
कार्यक्रम सुरू असतानाच शहर वाहतूक शाखेतर्फे नियम मोडणाऱ्यांवरही कारवाई करणे सुरू होते. निशिकांत काकडे या वाहनचालकाने मशिनचे उद्‌घाटन होताच कॅशलेस दंड भरला.

Web Title: scam control by cashless