रावसाहेब दानवे यांच्या नावाने कोट्यावधींना गंडवले 

मनोज साखरे
शुक्रवार, 19 मे 2017

खासदार रावसाहेब दानवे यांचा स्वीय सहायक असल्याच्या थापा मारीत या भामट्यांनी गरजूंना हेरले. कंत्राटदार, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही आमिषे दाखवली. नोकरी लावून देण्यासोबतच विविध सरकारी कामे करून देण्याचे सांगत लोकांना जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून विशिष्ट रक्कमा घेतल्या

औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत अनेकांना नोकऱ्या लावून देण्याचे, बढत्या, कंत्राटे मिळवून देण्याची आमिष दाखवून तीनजणांनी कोट्यावधींचा गंडा घातला. यात एका संशयित भामट्याला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

खासदार रावसाहेब दानवे यांचा स्वीय सहायक असल्याच्या थापा मारीत या भामट्यांनी गरजूंना हेरले. कंत्राटदार, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही आमिषे दाखवली. नोकरी लावून देण्यासोबतच विविध सरकारी कामे करून देण्याचे सांगत लोकांना जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून विशिष्ट रक्कमा घेतल्या. याबाबत औरंगाबाद पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी याप्रकरणात संशयिताचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, औरंगाबाद पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखा व अन्य एका पथकाने तपास सूरू केला. आठ दिवस या बाबींवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले व यातील मुख्य संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून यातील अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे. 

पंधरापेक्षा अधिक जणांची फसगत 
"दानवे यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत तो राज्यभरात फिरतो, त्याने शहरातील काही व्यक्तींसोबतच राज्यातील सूमारे पंधरापेक्षा अधिक नागरिकांना गंडवले. फसवणूकीचा आकडा कोट्यावधींच्या घरात असल्याची,'' बाब पोलिस आयूक्त यादव यांनी स्पष्ट केली

Web Title: scam in marathwada