गुणवत्तेची सहा लाखांत विक्री! 

मनोज साखरे
गुरुवार, 18 मे 2017

नियूक्तीपत्र मिळाल्यानंतर औरंगाबाद पोलिसांना खबऱ्याने ही बाब सांगितल्यानंतर स्थानिक गून्हेशाखेच्या पोलिसांनी काद्राबाद येथे जाऊन पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी व घरझडती घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली येथून खरेदी केलेले वनवे इनकमिंग कॉलींगचे विशिष्ट मोबाईल व वायरलेस इअरफोन सापडले

औरंगाबाद - मित्रांना पोलिस करण्यासाठी दोन तरूणांनी भौतिक चाचणी दिली, अन्य दोघांनी लेखी परिक्षा देऊन गूणवत्तेच्या जोरावर मेरीट मिळवली. तब्बल सहा लाखांत अंगी असलेल्या कौशल्याची व गूणवत्तेची विक्री करून या चौघांनी दोन मित्रांना पोलिस बनवले. हा घोळ ठाणे येथील पोलिस भरतीदरम्यान झाला. ही तोतयेगिरी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी उघड केली. 

औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस आयूक्त डॉ. आरती सिंह यांनी माहिती दिली की, ठाणे येथे पोलिस भरतीसाठी भारत राजेंद्र रूपेकर व तेजराव बाजीराव साबळे यांनी अशी गैरमार्गाने निवड झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी आपले मित्र झनक चैनिसिंग चरांडे, वाहाब नवाब शेख, राजू भिमराव नागरे, दत्ता कडूबा नलावडे (रा. काद्राबाद) यांच्या मदतीने पोलिस शिपाई पदाची शिडी चढली. यापैकी झनक व वाहाब यांनी भौतिक चाचणी दिली. या बदल्यात दोघांना प्रत्येकी दोन लाख रूपये तर त्यानंतरची लेखी परिक्षा देणाऱ्या राजू व दत्ता यांना प्रत्येकी चार लाख देण्याची डील ठरली होती. यातील एकाने चार लाख रूपये दिले होते. नियूक्तीपत्र मिळाल्यानंतर औरंगाबाद पोलिसांना खबऱ्याने ही बाब सांगितल्यानंतर स्थानिक गून्हेशाखेच्या पोलिसांनी काद्राबाद येथे जाऊन पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी व घरझडती घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली येथून खरेदी केलेले वनवे इनकमिंग कॉलींगचे विशिष्ट मोबाईल व वायरलेस इअरफोन सापडले. पोलिस बनलेल्या दोघांकडून घेतलेल्या चार लाखांतील काही रकमेची राजू व दत्ता यांनी दिल्लीतून वनवे कॉलींगचा मोबाईल खरेदी केले होते. याचा वापर अन्य परिक्षार्थ्यांसाठी ते करणार होते. 

राजू नागरे व दत्ता नलावडे बूद्धीवान असून नलावडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परिक्षा पास झाला आहे. दोघेही टेक्‍नोसेव्ही असून त्यांना आणखी काही जणांची साथ असल्याची बाब पोलिस आयूक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितली.

Web Title: scam in police recruitment