Crime News : अनाथ तरुणींच्या विवाहाचा बाजार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

scam with youth marriage orphan girls crime police family

Crime News : अनाथ तरुणींच्या विवाहाचा बाजार!

उदगीर : प्रचंड बेकारी व समाजातील मुलींची घटती संख्या यामुळे हजारो तरुण विवाहासाठी अनेक माध्यमाचा वापर करुन मुलीचा शोध घेत आहेत. यांचा गैर फायदा घेत अनेकजन मुलींच्या शोधात असलेल्या कुटूंबीयांना लुटण्या धंदा सुरू केला आहे.

अशीच घटना उदगीर येथील एक बोगस अनाथाश्रमाच्या बंडी- बबली कडून घडत असल्याचे समोर आले असुन जिजामाता शिक्षण संस्थेच्या प्रमे मधुर अनाथ आश्रमातील मुलींचा विवाह करायचा असल्याचा संदेश अनेक सोशल माध्यमात टाकुन संस्थेच्या खात्यात साडे सहा हजार रुपये टाकल्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम केली जाईल म्हणत लुटले जात आहे.

या संस्थेने महाराष्ट्रातील हजारो अविवाहित तरुणांना लुटले जात आहे. कोणी मुलगी देता का ? मुलगी, एका अविवाहित तरुणांला कोणी मुलगी देता का? लग्न करुन संसार उभारायचा आहे. असे म्हणण्याची वेळ आजच्या हजारो तरुणांवर आली आहे. समाजाती मुलींची असलेली प्रचंड कमतरता व मोठ्याप्रमाणात वाढत चाललेली बेकारी यामुळे अविवाहीत तरुणांची संख्या वाढली आहे.

यांचा फायदा घेत अनेकजन लुटण्यांचा धंदा सुरु केला आहे. सोशल मिडीयावर अनाथ मुलींचे लग्न करायचे असल्याचे सांगुन अनेक तरुणांनाची अर्थिक लुट करण्यात आली आहे. उदगीर येथील बोगस जिजामाता शिक्षण संस्थेच्या प्रमे मधुर अनाथ आश्रमात काही अनाथ मुली असुन त्यांचा विवाह करायचा असल्याची माहिती सोशल मिडीयावर टाकून संस्था अनाथ मुलीचे लग्न लावून देत सुखी संसारासाठी ५० हजार रुपयांची मदतही केली जाईल असे सांगत यासाठी अगोदर संस्थेच्या खात्यात साडे सहा हजार रुपये टाकावे लागतील. यासाठी त्यांनी रितसर फोन पे नंबर व बँकखाते दिले आहे.

अनेक तरुण आपला विवाह होईल या आशेने संबंधित व्यक्तीवर विश्वास टाकून त्यांच्या खात्यात  साडे सहा हजार रुपये टाकले. मात्र त्यांना मुलगी दाखविण्यात आली ना पैसे परत मिळाले त्यांची शुध्द लुट होत आहे.  ज्या कोमल पाटील सोबत फोनवर बोलने झाले तो फोन ही बंद झाला असून प्रेम मधुर अनाथ आश्रम संस्था उदगीर येथील संस्थापक रामकृष्ण रमेश सोलव, संचालक नंदकिशोर साहेबराव धर्माळे हे आहेत.

त्यांनी दिलेला पत्ता उदगीर येथील मोंढा रोड, यशवंत कॉलणी, विकास नगर, उदगीर असा असुन माधुरी नंदकिशोर धर्माळे यांच्या फोन पे वरच पैसे मागवले जात आहेत. सदर संस्थेने विदर्भातील अनेक भागातील तरुणांना अशा प्रकारे लुटले असुन अमरावती व नागपूर येथील पिडीत तरुण सोशल मिडीया चर्चाही करीत आहेत. 

महिला व बालविकास विभागाअंतर्गत मान्यता प्राप्त चार शिशुग्रह (अनाथ अश्रम ) आहेत.उदगीरातील प्रेम मधुर नावाचे कुठलेच अनाथ अश्रम नाही. ज्या अधिकृत शिशुग्रहात केवळ ०ते ६ वर्ष वयोगटातील मुलेच राहतात. इतर मुले विवाह योग्य असल्यास कार्यालया मार्फत संपुर्ण प्रक्रीया पुर्ण करुण विवाह केला जातो.

देवदत्त गिरी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लातूर