जीवनावश्यक वस्तू विक्रीचे ठरले वेळापत्रक

vai.jpg
vai.jpg


वाई बाजार,(ता.माहूर, जि.नांदेड) ः जीवनावश्यक वस्तू मुळे सर्वसामान्य ग्रामस्थांचे हाल होऊ नये या दृष्टिकोनातून उपविभागीय पोलिस अधिकारी माहूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता.एक) रोजी वाई बाजार येथे श्री.व्यंकट प्रभु फॅमिली रेस्टॉरंट सोशल डिस्टन्स मध्ये बैठकीचे आयोजन करून भाजीपाला मार्केट व किराणामाल दुकानाचे वेळापत्रक ठरवून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.तर सिंदखेड पोलिसांनी वाई बाजार परिसरात बिनकामी फिरणाऱ्या हवश्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई चा बडगा उगारला.


जागृती निर्माण करून दक्षता घेण्याचे आवाहन
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून सिंदखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त लावलेला आहे.आठवडी बाजार सह मुख्य चौकाचौकात २४ तास पोलिस तैनात असल्याने हरेक व्यक्ती घराबाहेर पडण्यास धाजवत आहेत. कोरोना आजारा संदर्भात भीती नाही. तर जागृती निर्माण करून दक्षता घेण्याचे आवाहन सिंदखेड पोलिसांनी केले होते. या अहवानाला वाई बाजार येथील नागरिक देखील स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत आहेत. परंतु बाहेरील खेड्यापाड्यातील हावशे कारण नसताना दुचाकी, चारचाकी वाहन घेऊन वाई बाजारचा दौरा करत होते. पोलिसांनी अकरा वाहनचालकांवर हजारो रुपयाचे दंड आकारून कार्यवाहीचा बडगा उगारला त्यामुळे अशा वाहनचालकांना चांगलीच अद्दल घडली.


सोशल डिस्टन्स मध्ये बैठक
आज (ता.१) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजीपाला मार्केट बेहेरे पाटील यांच्या खुल्या भूखंडावर सुरक्षित अंतरावर दुकाने लावण्याचे ठरले व भाजीपाला आणि किराणा दुकाने आठवड्यातून तीन दिवस शुक्रवार, रविवार आणि मंगळवार दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भरविली जावीत असे ठरले. नितीन कन्नलवार यांच्या श्री.व् यंकट प्रभु फॅमिली रेस्टॉरंट येथे आयोजित केलेल्या सोशल डिस्टन्स मधील बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल रुणवाल, उपसरपंच हाजी उस्मान खान, राजू दूंगे, वाई बाजार चे पॅनल प्रमुख फिरोज खान पठाण, पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण,सुभाष खडसे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पठाण,पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण व अत्रिनंदन शिंदे आदींची उपस्थिती होती. शेवटी जीवनावश्यक गरजा पूर्ण करत असताना संचार बंदीचे उल्लंघन होणार नाही या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com