राज्यातील नऊ कृषी व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

 Scholarships for students of nine Agricultural Management Colleges of the State
Scholarships for students of nine Agricultural Management Colleges of the State

लातूर- राज्यातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देण्याचे निर्णय 2015 मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला होता. त्यामुळे राज्यातील नऊ विनाअनुदानित कृषी व्यवसाय व्य़वस्थापन महाविद्यालयांनी न्यायालयात दाद मागितली होती. यात न्यायालयाच्या आदेशानुसार आता या महाविद्यालयातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या संदर्भात, (ता.4) जुलै रोजी आदेशही काढले आहेत.

राज्यात कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालये सुरु आहेत. या महाविद्यालयातील विमुक्ती जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना 2014-2015 मध्ये शासनाने शिष्यवृत्ती नाकारली होती. शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहत असल्याने असोसिएशन आॅफ अॅग्रिकल्चर आणि अॅग्रिकल्चर अलाईड कॉलेजच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यात न्यायालयाने ता. 27 जून 2016 रोजी आदेशही दिले होते. त्यावर आता राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.

राज्यातील लातूर येथील कॉलेज आॅफ अॅग्रिक्लचर बिझनेस मॅनेजमेंट, नारायणगाव (ता. जून्नर) येथील ग्रामोन्नती मंडळाचे एबीएम आॅफ अॅग्रिक्लचर बिझनेस मॅनजमेंट, सांगली येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ अॅग्रिक्लचर बिझनेस मॅनजमेंट, गुंजलवाडी (संगमनेर) येथील महाराष्ट्र होमिओपॅथिक फाऊंडेशनचे कॉलेज आॅफ अॅग्रिक्लचर बिझनेस मॅनजमेंट, पंचवटी (नाशिक) येथील के. के.वाघ क़ॉलेज आॅफ अॅग्रिक्लचर बिझनेस मॅनजमेंट, वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल कॉलेज आॅफ अॅग्रिक्लचर बिझनेस मॅनजमेंट, शारदानगर (बारामती) येथील कॉलेज आॅफ अॅग्रिक्लचर बिझनेस मॅनजमेंट, विवेकानंदनगर (ता. मेहकर) येथील विवेकानंद कॉलेज आॅफ अॅग्रिक्लचर बिझनेस मॅनजमेंट, व लोनी (ता. अहमदनगर) येथील कॉलेज आॅफ अॅग्रिक्लचर बिझनेस मॅनजमेंट या नऊ महाविद्यालयातील विमुक्ती जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती संबंधीचे अर्ज संबंधीत महाविद्यालयाकडून आॅफलाईन पद्धतीने स्वीकारून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर
करावी असे आदेश शासनाने दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com