मुख्यमंत्र्यांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमातील गावात शाळेला अवकळा

 औरंगाबाद : वर्गखोलीतील भिंत कधीही ढासाळू शकते, या भिंतीजवळच विद्यार्थींनींना जीव मुठीत धरुन बसावे लागते. मुख्यमंत्र्यांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमातील गावात शाळेला अवकळा
औरंगाबाद : वर्गखोलीतील भिंत कधीही ढासाळू शकते, या भिंतीजवळच विद्यार्थींनींना जीव मुठीत धरुन बसावे लागते. मुख्यमंत्र्यांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमातील गावात शाळेला अवकळा

औरंगाबाद - मुख्यमंत्र्यांच्या फ्लॅगशिपमधील (महत्त्वाकांक्षी कार्यक्रम) व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशनमध्ये निवडलेल्या गावांमध्ये शंभर टक्‍के योजनांची अंमलबजावणी करून ती गावे आदर्श करण्यात येणार आहेत. मात्र, तालुक्‍यातील आडगावची 'व्हीएसटीएफ'मध्ये निवड होऊनही जिल्हा परिषद शाळेला अवकळा आली आहे. तब्बल 63 वर्षांपूर्वी बांधलेल्या वर्गखोल्यांना पावसाळ्यात धारा लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. 

शासनाने 'व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन' या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या माध्यमातून गावे आदर्श करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा या गावांना शंभर टक्‍के लाभ देण्याची व्हीएसटीएफमध्ये संकल्पना आहे. यात आडगाव सरक या गावाचाही समावेश आहे. मात्र, या गावातील शाळेची खूपच दुरवस्था आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. कार्यालयासह सात वर्गखोल्या वर्ष 1956 मध्ये बांधलेल्या आहेत. शाळेची एकूण पटसंख्या 181 इतकी आहे. शाळेच्या भिंतींना तडे गेले आहेत, तर पत्रे फुटल्याने थोड्या पावसातही वर्गखोल्यांमध्ये पाणी गळायला लागते. काही शिक्षकांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितले, की खोल्या गळत असल्याने विद्यार्थ्यांना इकडेतिकडे बसवावे लागते किंवा जोराचा पाऊस आला तर शाळेला सुटी देण्यावाचून पर्याय राहत नाही. 
शाळेत स्वच्छतागृहाचीही खूप दुरवस्था झालेली आहे. विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छतागृहाची स्थिती न विचारलेलीच बरी! ग्रामपंचायतीतर्फे आरओ प्लॅंट बसवून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे; मात्र ज्या ठिकाणी ही व्यवस्था केलेली आहे त्या खोलीचे छत कधीही कोसळू शकते. त्यामुळे तिथे पाणी पिण्याला जाण्यासाठी विद्यार्थी धजावत नाहीत. 

शालेय समितीने प्रस्ताव देऊनही दुर्लक्ष 
सरपंच लंकाताई यांचे पती नारायण बांबर्डे यांनी सांगितले, की शाळेची दुरुस्ती व नवीन बांधकाम करून देण्याविषयी मागणी करणारा ठराव शालेय व्यवस्थापन समितीने घेतलेला आहे. 18 सप्टेंबर 2017 आणि 20 नोव्हेंबर 2018 रोजी तसेच 15 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्रशासनाला प्रस्ताव दिले. ऑगस्ट 2018 मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडेही प्रस्ताव देऊन शाळेसाठी नवीन इमारत बांधून देण्याची मागणी केली आहे; मात्र फारशी दखल घेतली गेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com