हिंगोली: महाविद्यालयाची स्कूल बस पेटवली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

दरम्यान हिंगोली ते अकोला मार्ग रिसाला बाजार येथे रस्त्यावर टायर जाळून टाकण्यात आले आहे. तर हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूर चित्ता येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे.

हिंगोली : सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयांच्या आवारातील मिनी स्कूल बस पेटवून दिल्याची घटना गुरुवारी (ता. 9) पहाटे तीन वाजता घडली आहे. यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे.

या शिवाय हिंगोली शहरातील रिसाला बाजार व हिंगोली कळमनुरी मार्गावर खानापूर चित्ता येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये ही या बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान आज पहाटे तीन वाजता सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयाच्या आवारात उभी करत आलेली महाविद्यालयाची विद्यार्थी वाहतूकीची मिनीस्कूल बस कोणीतरी पेटवून दिली. हा प्रकार गस्तीवर असलेल्या सेनगावचे  पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांच्या लक्षात आल्यानंतर  महाविद्यालयाचे  रखवालदार पोलिसांच्या मदतीने आगीवर पाणी टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही आग नियंत्रणात आली. मात्र तोपर्यंत स्कूल बस जळून खाक झाली. दरम्यान हिंगोली ते अकोला मार्ग रिसाला बाजार येथे रस्त्यावर टायर जाळून टाकण्यात आले आहे. तर हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूर चित्ता येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे.

Web Title: school bus torched fire in Hingoli