शालेय मुलीवरील अत्याचार करणाऱ्या तिघांना शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

बीड - शाळेकडे निघालेल्या बारा वर्षीय मुलीला तिघांनी जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्यावर गाडीतच अत्याचार केल्याची घटना खडकत (ता.आष्टी) शिवारात दोन वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील तिघांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवून यातील दोघांना दहा वर्षांची, तर एकास तीन वर्षांची शिक्षा सोमवारी (ता.14) सुनावली आहे. 

खडकत येथील बारा वर्षीय मुलगी 19 नोव्हेंबर 2014 ला रस्त्याने एकटीच शाळेमध्ये जात होती. दरम्यान, आरोपी झीशान बशीर पठाण, डॉन ऊर्फ शाकेर शब्बीर सय्यद आणि शोएब ताहेर कुरेशी या तिघांनी ओमिनी व्हॅनमध्ये तिला जबरदस्तीने बसविले. यानंतर आरोपी झीशान बशीर पठाण व शाकेर सय्यद या दोघांनी गाडीतच तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर 20 नोव्हेंबरला आष्टी पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे यांनी तपास करून हे प्रकरण बीड येथील अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक तीनमध्ये दाखल केले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने बारा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश व्ही. व्ही. विदवांस यांनी तीनही आरोपींना शिक्षा ठोठावली. यातील अत्याचार करणाऱ्या झीशान पठाण व शाकेर सय्यद या दोघांना दहा वर्षांची, तर शोएब ताहेर कुरेशी याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील ऍड. मिलिंद वाघीरकर यांनी बाजू मांडली.

Web Title: School girl abused