शाळेची भिंत पडून विद्यार्थींनी जखमी

राजाभाऊ नगरकर
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

जिंतूर : शहरातील उस्मानपुरा भागातील हजरत अबूबकर सिद्दीकी प्राथमिक उर्दू शाळेची भिंत सोमवारी (ता.17) दुपारी दीडच्या सुमारास अचानक कोसळून पडली. यात इयत्ता चौथीमधील सात विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने कसलीहि प्राणहानी झाली नाही. 

उस्मानपुरा भागात अब्दुल माबूद हुस्नोद्दीन कुरेशी यांची प्राथमिक व माध्यमिक उर्दू शाळा असून येथे 324 विद्यार्थी शिकतात. सोमवारी सकाळी रोजच्याप्रमाणशाळा सुरू असताना दुपारी दीड ते दोनच्या सुमारास अचानक 4 व 5 व्या वर्गाची भिंत बाहेरील बाजूस कोसळली. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी पालकांनी शाळेकडे धाव घेतली. यामध्ये सय्यद अंशीरा, खिजरा तालेब चाऊस, रुमैय्या नसीब खा, हूमेरा नसीब खा, फातेमाबी शेख अझर, सुमैय्या फैजुलला खा, सानिया रहीम शेख विद्यार्थिनीं किरकोळ जखमी झाल्या असून इतर काही विद्यार्थ्यांना मुका मार लागला.
 
Web Title: School wall collapsed and students injured

टॅग्स