डिसेंबर महिन्यात वाजणार शाळेची घंटा! विद्यार्थ्यांना लागेल पालकांचे संमतिपत्र

school ganta.jpg
school ganta.jpg

जालना : जवळपास सहा महिन्यानंतर डिसेंबर महिन्यात शाळांची घंटा वाजण्याची शक्यता आहे. मुलांच्या शालेय उपस्थितीबाबत पालकांचे संमतिपत्र आवश्यक ठरणार आहे,हे विशेष.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गजन्य परिस्थितीने शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे.दरवर्षी प्रमाणे ऑक्टोबर महिना हा प्रथम सत्र परीक्षा किंवा दिवाळी सुटीचा असतो.परंतु कोरोना संसर्गजन्य परिस्थितीने अद्यापपर्यंत प्रत्यक्ष शाळेचे वर्ग उघडले नाहीत. ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता अजून डिसेंबर महिन्यात कदाचित शाळा सुरु होतील. परंतु यालाही मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक ठरणार आहे. पुढील महिन्यात दिवाळी सण असल्याने सुटीच राहील. दिवाळी सुटीत नोव्हेंबर महिना जाणार असून डिसेंबर महिन्यात शाळा सुरु करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरु असल्याची विश्वसनीय माहिती आहे. 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. बारावी वर्गाच्या विविध विषयांच्या मूल्यमापन आराखड्याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे.यामुळेच नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग डिसेंबर महिन्यात सुरु होतील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दहावी-बारावी बोर्ड परीक्षाही ऑनलाइन घेण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून अभ्यास करण्यात येत आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु करताना कोणती दक्षता व खबरदारी घेतली पाहिजे,याची नियमावली शिक्षण विभागाने (ता.२९) काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. पूर्व-प्राथमिक ते बारावीपर्यंत वर्ग सुरुवात करताना फिजिकल डिस्टन्सिंग नियम, वर्ग खोल्या व परिसर निर्जंतुकीकरण करण्याबाबत नियमावली देण्यात आली आहे. 

दिवाळीनंतरच म्हणजे डिसेंबर महिन्यात कदाचित वर्ग सुरु होतील. कारण दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे नियोजन महत्वाचे आहे. सध्या शिक्षकांचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरु आहे. - संजय चौधरी, शिक्षक, राजूर

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com