शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायती आयएसओ केल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

औरंगाबाद - ""जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायती आयएसओ करून त्यात विविध उपक्रम राबविले. ग्रामपंचायतीत पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लान्ट बसविण्यात आले. "माहेरघर‘सारखी संकल्पा राबवून यशस्वी केली. अशा सर्व कामांचे मागील दीड वर्षात समाधान आहे,‘‘ अशी भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद - ""जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायती आयएसओ करून त्यात विविध उपक्रम राबविले. ग्रामपंचायतीत पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लान्ट बसविण्यात आले. "माहेरघर‘सारखी संकल्पा राबवून यशस्वी केली. अशा सर्व कामांचे मागील दीड वर्षात समाधान आहे,‘‘ अशी भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केली.

भंडारा येथे जिल्हाधिकारीपदी बदली झाल्यावर त्यांनी सोमवारी (ता. 27) माध्यमांशी संवाद साधला. ""जिल्हा परिषदेतील फाईल वर्क सुधारले आहे. आता नवीन वर्षात 275 ग्रामपंचायती आयएसओ करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. इंदिरा आवास योजनेतील 95 टक्के लाभार्थींना लाभ मिळून दिला. सिल्लोडमध्ये या योजनेत बॉण्ड लिहून घेणाऱ्या संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. माहेरघर, चांगल्या स्मशानभूमी, जलयुक्तची चांगली कामे केली गेली. सीसीटीव्ही यंत्रणा, बायोमॅट्रिक, एक दिवस गावकऱ्यांसोबत, राज्यस्तरीय विकास परिषद अशा योजना, उपक्रम यशस्वीपणे राबविले,‘‘ असे ते म्हणाले.

मालमत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्‍यक
""जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढले पाहिजे. त्यासाठी मालमत्ता विकसित करून त्यातून उत्पन्नाची साधने निर्माण केली पाहिजे. मोमबत्ता तलावात बोटिंग सुरू करण्यात येणार आहे. त्यातून जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळेल. मालमत्ता विकसित करण्यासाठी बीओटीचाही पर्याय आहे. जिल्हा परिषदेच्या मालमत्ता नोंदणी करून त्यांची कागदपत्रे जमा करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नही सुरू केले होते,‘‘ असे त्यांनी सांगितले.

समाजकल्याण, सिंचन विभागात सुधारणा आवश्‍यक
जिल्हा परिषदेतील समाजकल्याण, सिंचन विभागाला पूर्णवेळ अधिकारी न मिळाल्याने या विभागांची कामे समाधानकारक झाली नाही. यामध्ये खूप सुधारणेची गरज आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आल्यापासून सिंचनमधील कामात सुधारण झाली. या शिवाय शिक्षण विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला नव्हता, त्यामुळे कामे होत नव्हती. आता नवीन शिक्षणाधिकारी आल्याने कामे होत आहेत. तसेच पंचायत आणि महिला व बालकल्याण विभागाचे काम चांगले असल्याचे त्यांनी नमूद केले.

पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसोबत समन्वय
काही मतभेद होतात; मात्र लोकप्रतिनिधींसोबत एकत्र येऊन काम केले. चांगल्या कामात लोकप्रतिनिधींनी कधीही अडथळा आणला नाही. त्यांच्यासोबत चांगला समन्वय राहिला, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Schools. anganwadis, the village ISO