या जिल्ह्यात आज होणार शाळा सुरु

मंगेश शेवाळकर
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

हिंगोली :   मराठवाड्यात केवळ हिंगोली जिल्‍ह्‍यातील शाळांची घंटा सोमवारी (ता.११) वाजणार आहे. इतर ठिकाणी मात्र शाळा तीन दिवस उशिराने सुरु होणार आहेत. शिक्षण विभागाच्‍या या धोरणामुळे जिल्‍ह्‍यातील सुमारे चार हजार शिक्षकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

 

हिंगोली :   मराठवाड्यात केवळ हिंगोली जिल्‍ह्‍यातील शाळांची घंटा सोमवारी (ता.११) वाजणार आहे. इतर ठिकाणी मात्र शाळा तीन दिवस उशिराने सुरु होणार आहेत. शिक्षण विभागाच्‍या या धोरणामुळे जिल्‍ह्‍यातील सुमारे चार हजार शिक्षकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

 

राज्यात दिवाळी निमित्ताने शाळांना जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळांना सुट्टया जाहिर करण्यात आलेल्या होत्या. महाराष्ट्र राज्य एक असून प्रत्येक विभागात सुट्टयाचे नियोजन शिक्षण विभागाने केले होते. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम विभागात वेगवेगळे नियोजन होते. सुट्ट्या ठरविण्याचे अधिकार राज्य शिक्षण संचालक माध्यमिक विभागाला असले तरी स्थानिक पातळीवर त्यामध्ये बदल करून शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी उन्हाळी व दिवाळी सुट्ट्यांचे नियोजन करायचे असते.

वर्षाचे शैक्षणिक कार्य दिवस २३० ते २३५ होणे गरजेचे असते. त्याप्रमाणे हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाने उन्हाळी सुट्टया दिनांक ता. २ मे २०१९ ते ता. १५ जून २०१९ आणि दिवाळी सुट्टया ता. २१ ऑक्‍टोबर ते ता. ९ नोव्‍हेंबरपर्यत जाहिर केल्‍या होत्या. ता. १० नोव्‍हेंबर रोजी रविवार असल्याने सोमवारपासून (ता.११) नियमितपणे शाळा सुरू होतील असे शिक्षण विभागाने स्‍पष्ट केले होते.

सुट्टयात बदल

दिवाळी सुट्टी पूर्वीच विधानसभा निवडणुका झाल्‍या. मतदान प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्‍ती केली. त्‍यांचा हे कामाचे दिवस कर्तव्याचे दिवस गृहित धरल्‍याने राज्यातील अनेक जिल्हा परिषदेने दिवाळी सुट्टयात बदल केला होता. तसेच मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण विभाग वगळता इतर जिल्हा परिषदेने दिवाळी सुट्टयात बदल करून गुरुवारी (ता.१४) शाळा सुरु केल्‍या जातील असे पत्रही काढण्यात आले होते.

या संदर्भात जिल्‍ह्‍यातील शिक्षकांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधून हिंगोली जिल्‍ह्‍यातील सुट्टयांच्‍या वेळेत बदल करावा अशी मागणी केली होती. मात्र शिक्षण विभागाने या संदर्भात शिक्षण संचालकांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागवले. मात्र अद्यापही शिक्षण संचालक कार्यालयाचे मार्गदर्शन प्राप्‍त झालेच नाही. त्‍यामुळे हिंगोली जिल्‍ह्‍यातील शाळा सोमवारी (ता.११) सुरु होणार आहेत. शिक्षण विभागाच्‍या वेळकाढू धोरणामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे

ReplyForward


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools will be started in this district today