"कर्जमाफी'ची व्याप्ती वाढणार -  दिवाकर रावते

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

उस्मानाबाद - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची (कर्जमाफी) व्याप्ती वाढविण्यासाठी पती-पत्नीच्या ऐवजी वैयक्तिक खातेदार घटक ग्राह्य धरण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच, मराठवाड्यातील नवे-जुने योजनेतील लाभार्थ्यांचे जुने कर्ज माफ करण्यासंबंधी शासनाकडे मागणी केल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. 28) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते आदी या वेळी उपस्थित होते. 

श्री. रावते म्हणाले, की गेल्या वर्षापासून राज्यात कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेल्यांची संख्या वाढलेली नाही. तसेच, कर्जमाफीचा आकडाही मोठा नाही. त्यामुळे शासन कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविण्याच्या विचारात आहे. योजनेत पती-पत्नी व 18 वर्षांखालील अपत्य एक कुटुंब ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना याचा फटका बसला आहे. एकरकमी परतफेडीसाठीही असे कुटुंब तयार होत नाहीत. त्यामुळे पती-पत्नी एक लाभार्थी ग्राह्य धरण्याऐवजी वैयक्‍तिक धरून योजना राबविण्याचा शासनाचा विचार आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असेही ते या वेळी म्हणाले. दरम्यान, एकरकमी परतफेड योजनेत बॅंकांनीही सहभाग घ्यावा. शासनाचे दीड लाख रुपये खात्यावर येऊ शकतात. त्यासाठी बॅंकांनी आणखी सवलत देऊन अशा थकबाकीदारांना आकर्षित करावे, अशी सूचना केली. 

"नवे-जुने'तील  जुने माफ करा 
मराठवाड्यात जिल्हा बॅंकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. बॅंकेचा एनपीए वाढू नये, यासाठी अशा जिल्हा बॅंका कागदोपत्री व्यवहार दाखवून जुन्या कर्जाचे नव्या कर्जात रूपांतर करतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे खाते थकीत जात नाही. परिणामी, एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात 57 हजार खातेदारांना नवे-जुने पद्धतीचा फटका बसला आहे. मराठवाड्यात अशा शेतकरी सभासदांची संख्या मोठी आहे. त्यासाठी शासनस्तरावर याचा विचार केला जात असून, लवकरच यावर निर्णय होईल, अशी अपेक्षा श्री. रावते यांनी या वेळी व्यक्त केली. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. अशा सर्वच कर्जदारांचे जुने कर्ज माफ करून नव्याने कर्ज देण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: The scope of the loan waiver will increase says Diwakar Raote