भंगार वाहने उचलण्याची तीन दिवस मोहीम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - शहरातील रस्त्यांवर अडथळा करणारी भंगार वाहने उचलण्याची मोहीम तीन दिवस चालणार आहे. महापालिका, पोलिस व आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने ही माहीम एक ते तीन डिसेंबरदरम्यान राबवली जाणार असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी गुरुवारी (ता.२९) सांगितले.

शहरातील रस्त्यावर शेकडो भंगार वाहने पडून आहेत. त्याचा वाहतुकीला अडथळा होता. तसेच शहराचे विद्रूपीकरणही होत आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य शासनाच्या गृह विभागाने रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी भंगार वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नुकतीच पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात भंगार वाहने उचलण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम आता एक ते तीन डिसेंबरदरम्यान राबविण्यात येईल.

तयारी केली पूर्ण 
भंगार वाहने उचलण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. प्रत्येक वॉर्ड कार्यालयासाठी दोन क्रेन आणि ट्रक दिले जाणार आहेत. ही वाहने गरवारे क्रीडा संकुलामधील जागेत ठेवण्यात येणार आहे.

३३० भंगार वाहने
भंगार वाहनांचे वॉर्ड अभियंता आणि नागरिक मित्र पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. अभियंत्यांनी केलेल्या सर्वेक्षणात १८७, तर नागरिक मित्र पथकाच्या सर्वेक्षणात १४६ वाहने आढळली. यात बस, ट्रक, टेंपो, कार, रिक्षा व दुचाकी वाहनांचा समावेश आहे.

Web Title: Scrab vehicle Crime RTO