पेट्रोलियम पदार्थ शोधासाठी सर्वेक्षण

Petroleum-Substance-Searching
Petroleum-Substance-Searching

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्‍यात पेट्रोलियम, खनिज पदार्थांच्या शोधासाठी केंद्राच्या पेट्रोलियम मंत्रालय विभागामार्फत हैदराबादच्या अल्फाजिओ कंपनीकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार शंभर फूट खोलवरील खडक काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे.

पेट्रोलियम पदार्थ, खनिजाचा साठा असण्याची शक्‍यता लक्षात घेता केंद्राच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूचनेनुसार अल्फाजिओ कंपनीने यापूर्वी उपग्रहाद्वारे या भागात पाहणी केली होती. त्यानंतर या तालुक्‍यातील ढेगज, वडचुना, भोसी, सावळी बैनाराव या गावांच्या परिसरात सर्वेक्षणाचा निर्णय झाला. 

हा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने ‘अल्फाजिओ’ने विभागीय वन अधिकारी कार्यालयाकडे वनजमिनीमधून साहित्य वाहतुकीची परवानगी मागितली होती. विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी परवानगी दिल्यानंतर कंपनीचे सुमारे पंधरा ते वीस शास्त्रज्ञ या भागात यंत्रसामग्रीसह दाखल झाले आहेत. त्यांनी आजपासून सर्वेक्षणाच्या कामाला सुरवात केली आहे. 

पुढील पंधरा ते वीस दिवसांपर्यंत हे शास्त्रज्ञ सर्वेक्षणासाठी थांबणार आहेत. या गावांत दर अर्धा किलोमीटरवर शंभर फूट खोल छिद्र पाडून त्यातील खडक काढला जात आहे. 

खडकाची होणार तपासणी
सावळी भागातील खडकाचा काही भाग हैदराबाद व दिल्ली येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. तेथील अहवालानंतर या भागात पेट्रोलियम किंवा खनिज पदार्थ आहेत किंवा नाही, याची माहिती मिळेल. त्यानंतर पुढील निर्णय होईल, असे सांगण्यात आले.

औंढा तालुक्‍यात वन विभागाच्या जमिनीवरून साहित्य वाहतुकीची परवानगी ‘अल्फाजिओ’ने मागितली होती. ती देण्यात आली असून केंद्राच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारीतच या कंपनीचे काम सुरू आहे.
- केशव वाबळे, विभागीय वन अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com