उस्मानाबादेत सापडला दुसरा कोरोनाग्रस्त : मुंबईच्या ताज हॉटेलातून आला पळून

Osmanabad News
Osmanabad News

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित झालेल्यांची संख्या आता एकूण दोन झाली आहे. काल पहिला रुग्ण सापडल्यानंतरच उस्मानाबादकरांची झोप उडाली होती. पण आता दुसरा रुग्ण लोहारा तालुकातल्या धानुरी गावचा असल्याची माहीती समोर आली आहे.

पहिला रुग्ण उमरगा तालुक्यातील असून, दुसरा रुग्ण लोहारा येथील आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळया भागातील दोघांना कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. दुसर्‍या रुग्ण हा मुंबईतील ताज हाॅटेल येथे कामाला होता. मुंबईतच त्याला क्वारंटाईन करण्यात आले असतानाही तो पळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

मुंबईतून आलेत ४० जण पळून

लोहारा तालुकातल्या धानुरी गावचे जवळपास दीडशे तरूण मुंबईत ताज हाॅटेलमध्ये कामाला आहेत. त्यातील ३० ते ३४ जण या संशियताप्रमाणेच पळून आल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. अत्यावश्यक सेवेचा या संशयित रुग्णाने फायदा घेतला असुन ताज हाॅटेल वरुन त्याने वाशी मार्केटला येऊन तेथील संत्राच्या गाडीतुन थेट जळकोट व पुढे टमटम मधुन तो त्याच्या धानुरी गावाला पोहचल्याचे सांगितले जात आहे. 

गेल्या दोन ते तीन दिवसापासून तो गावातच असल्या कारणानं  गावात तो किती लोकांच्या संपर्कात आला आहे, याची माहिती प्रशानाकडून घेण्यात येत आहे. पण यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोनवर गेल्याने भितीचे वातावरणच निर्माण झाले आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दरम्यान, जिल्ह्यातील १३६ नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत. यातील १३ जण हे रुग्णालयामध्ये दाखल आहेत. जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातून; तसेच परदेशातून येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने धोका वाढला होता. आता पहिला रुग्ण आढळला असून, यापुढे ही साखळी थांबविण्याचे मोठे आव्हान आता प्रशासन तसेच आरोग्य विभागासमोर असणार आहे.

बाहेरून आलेल्या नागरिकांचा बुधवारपर्यंतचा आकडा सुमारे ५५ हजारांच्या जवळपास गेला होता. त्यावरून कोरोना विषाणूचा धोका जिल्ह्यामध्ये बळावणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com