सलग दुसऱ्या दिवशी एटीएम बंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर एमटीएममुळे बहुतांश नागरिकांना शंभर रुपयांच्या नोटा मिळाल्या होत्या. आता बॅंकांमध्ये तुंबळ गर्दी झालेली असताना एटीएम कधी सुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. व्यवहार सुरळीत होण्यासाठी गुरुवारी (ता.10) सलग दुसऱ्या दिवशी एटीएम बंद राहिले. औरंगाबादेत राष्ट्रीयीकृत बॅंकांचे साडेतीनशे, खासगी बॅंकांचे अडीशे तर सहकारी बॅंकांचे जवळपास शंभरपेक्षा जास्त एटीएम आहेत. एटीएमधून सुरवातीला दोन हजार रुपयेच काढण्याची मर्यादा असली तरी बॅंकांमध्ये रांगेत उभे राहण्यापेक्षा एटीएमधून पैसे काढणे सोयीचे असल्याचे सर्वांना वाटते.

औरंगाबाद - हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर एमटीएममुळे बहुतांश नागरिकांना शंभर रुपयांच्या नोटा मिळाल्या होत्या. आता बॅंकांमध्ये तुंबळ गर्दी झालेली असताना एटीएम कधी सुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. व्यवहार सुरळीत होण्यासाठी गुरुवारी (ता.10) सलग दुसऱ्या दिवशी एटीएम बंद राहिले. औरंगाबादेत राष्ट्रीयीकृत बॅंकांचे साडेतीनशे, खासगी बॅंकांचे अडीशे तर सहकारी बॅंकांचे जवळपास शंभरपेक्षा जास्त एटीएम आहेत. एटीएमधून सुरवातीला दोन हजार रुपयेच काढण्याची मर्यादा असली तरी बॅंकांमध्ये रांगेत उभे राहण्यापेक्षा एटीएमधून पैसे काढणे सोयीचे असल्याचे सर्वांना वाटते. आता लवकरात लवकर एटीएम सुरू होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. 

Web Title: second day off ATM