तहसील कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर

तहसील कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर

सोयगाव : तालुक्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि शेतकऱ्यांशी निगडीत असलेले अत्यंत महत्वाचे दस्तऐवज सांभाळणाऱ्या सोयगाव तहसील कार्यालयाचे मुख्यद्वार सुटीच्या दिवशी शनिवारी केवळ एका कडीवर लटकून होते. दरम्यान तहसील कार्यालयात शासनाची महत्वाची उपकोषागार विभागाची सुरक्षा या प्रकारामुळे वाऱ्यावर होती.

अतिगंभीर दुष्काळ जाहीर झालेल्या सोयगाव तालुक्यात दुष्काळाशी निगडीत असलेल्या तहसील, पंचायत समिती आणि कृषी विभाग या तीनही यंत्रणा बेजबाबदार असल्याने दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिवाळीच्या सुट्यानंतर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारची सुटी लागून आल्याने तहसील कार्यालयाला सुटी होती. परंतु, सुटीच्या काळातील तहसील प्रशासनाची सुरक्षा मात्र वाऱ्यावर होती. दरम्यान शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या तहसील कार्यालयात महत्वाचे दस्तऐवजसह शासनाची आर्थिक सुबत्ता राखणारी उपकोषागार विभागही असल्याने या उपकोषागार विभागाची सुरक्षा केवळ एका कडीवर अवलंबून होती. त्यामुळे ऐन दुष्काळात या विभागाचे काम बेजबाबदार पणाचे असल्याचे दिसून आले आहे.

सोयगावच्या दुष्काळात पंचायत समिती कार्यालयही प्रभारी गटविकास अधिकाऱ्याअभावी तीन महिन्यापासून होरपळले आहे. आठवडाभरापूर्वी तात्पुरता प्रभार दिलेल्या गटविकास अधिकाऱ्यालाही अद्याप कामाचा सूर गवसला नसल्याने दुष्काळात मोठी पंचायत झाली आहे. वनविभागाचा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे पदही आठवड्यापासून रिक्त असल्याने अजिंठ्याच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे सोयगावचा प्रभार देण्यात आला आहे. या अधिकाऱ्याकडे आधीच सिल्लोडचाही पदभार असल्याने वनविभागाच्या कामांचाही बोजवारा उडाला आहे. ऐन दुष्काळात प्रशासनाच्या या तीनही यंत्रणांचे तीनतेरा वाजल्याने दुष्काळात उपाय-योजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सोयगावला अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

तहसील कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर
सोयगाव तहसील कार्यालयाची सुरक्षा महिनाभरापासून वाऱ्यावर आहे. या ठिकाणी सुरक्षा म्हणून लावण्यात आलेल्या पोलिसाचाही बंदोबस्त राहत नसल्याने इतर दिवशीही सोयगाव तहसील पोलिस बंदोबस्ताअभावी कामकाज करत असते, सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असतांना शासनाच्या यंत्रणांच्या बेजबाबदार यंत्रणा या दुष्काळावर उपाय-योजना करण्याऐवजी दुष्काळ अधिक गडद करण्यावर जोर देत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com