आमदार प्रशांत परिचारकांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

उस्मानाबाद - सैन्य दलातील जवान, त्यांच्या कुटुंबीयांप्रती वादग्रस्त वक्‍तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचा आमदारपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्याच्या मागणीसाठी भारतीय माजी सैनिक संघटनेच्या जिल्हा शाखेने बुधवारी (ता. एक) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरवात करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले निवेदन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना देण्यात आले. आमदार परिचारक यांनी सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसंबंधी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल शहरातील आजी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, कुटुंबीयासह सर्वसामान्य नागरिकांतूनही तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. सैनिकांबद्दल केलेले बेजबाबदार वक्तव्य अगदी खालच्या पातळीवर जाऊन शब्दांचा वापर केला असल्याने सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे मानसिक मनोबल व संतुलन बिघडविण्याचे काम परिचारक यांच्याकडून झाले आहे. आमदार परिचारक यांनी स्वतः केलेल्या वक्तव्याची चूक कबूल करून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशा बेजबाबदार व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी करावी, तसेच कारवाई न झाल्यास आजी-माजी सैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या मोर्चात संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्‍य, उपाध्यक्ष मुरलीधर जाधव, प्रकाश रणखांब, आबाजी जाधव, आदिनाथ घोरपडे, लक्ष्मण कलबुर्गे, रामजीवन बोंदर, बालाजी शेंडगे, संजय यादव, जालिंदर जाधव, उत्तम वाघमारे, अरविंद रणखांब, सुभाष पवार यांच्यासह माजी सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Sedition case filed on the MLA Prashant prashant paricharak