हेलिकॉप्टरद्वारे डोंगरमाथ्यावर बीजरोपण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

औरंगाबाद - हेलिकॉप्टरद्वारे अवघड डोंगरमाथ्यावर एक लाख सीडबॉम्बिंग (बीजरोपण) करण्याच्या उपक्रमाची आज येथे सुरवात झाली. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन, वन विभाग, संरक्षण विभाग यांच्या वतीने गतवर्षी मोठी वृक्ष लागवड करण्यात आली; परंतु डोंगर माथ्यावर मनुष्यबळ पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी बीजरोपण केले तर मोठ्या प्रमाणात डोंगर हिरवे होतील, असे लक्षात आल्याने नवा पर्याय पुढे आला. सीडबॉम्बिंगची संकल्पना अमलात आणण्यासाठी एक लाख सीड बॉंब तयार करण्यात आले.

औरंगाबाद - हेलिकॉप्टरद्वारे अवघड डोंगरमाथ्यावर एक लाख सीडबॉम्बिंग (बीजरोपण) करण्याच्या उपक्रमाची आज येथे सुरवात झाली. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन, वन विभाग, संरक्षण विभाग यांच्या वतीने गतवर्षी मोठी वृक्ष लागवड करण्यात आली; परंतु डोंगर माथ्यावर मनुष्यबळ पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी बीजरोपण केले तर मोठ्या प्रमाणात डोंगर हिरवे होतील, असे लक्षात आल्याने नवा पर्याय पुढे आला. सीडबॉम्बिंगची संकल्पना अमलात आणण्यासाठी एक लाख सीड बॉंब तयार करण्यात आले. हे सीड बॉंब हेलिकॉप्टरच्या साह्याने डोंगर माथ्यावर टाकण्याची कल्पना पुणे येथील एलोरा एवीयएशन या कंपनीच्या साह्याने अमलात आणली. 

Web Title: seed bombing with helicopter